Madhya Pradesh Politics : कमलनाथांचे कट्टर समर्थक भाजपत डेरेदाखल; छिंदवाड्यात काँग्रेस रिकामी...

Madhya Pradesh Politics : मुख्यमंत्री यादवांचे मध्य प्रदेशात काँग्रेसमधील भूकंपाबाबत सूचक विधान...
Madhya Pradesh Politics
Madhya Pradesh PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Political News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते कमलनाथ लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांत रंगताना दिसली. काँग्रेस नेत्यांनी याचे खंडन करून, कमलनाथ कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, कमलनाथ यांच्याच मतदारसंघातील 50 पेक्षा अधिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या वेळी त्यांनी काँग्रेसलादेखील इशारा दिला. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Politics
Pune NCP News : अजितदादांचा भाजपमध्ये 'वट' नाही राहिला; जवळच्याच कोणी केला हल्लाबोल?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत तब्बल 50 पेक्षा अधिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री यादव म्हणाले, "काँग्रेसच्या लोकांची मने डळमळीत झाली आहेत. त्यांचे बरेचसे नेते हे आज नाही तर उद्या आमच्या पक्षात सामील होतील. तिकडून आमच्या पक्षात येणाऱ्यांचे स्वागत आहे. कारण शेवटी आपल्या सर्वांनाच देशाची सेवा करायची आहे. काँग्रेसचे आज काही येतील उद्या काही येतील, या विधानाचा रोख कमलनाथ यांच्याकडेच असल्याचे सांगण्यात येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी कमलनाथ यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या बालाघाट आणि छिंदवाडा येथे भेट दिली. बालाघाटमध्ये जवळपास 761.54 कोटी रुपयांच्या विकासकामांचा मुहूर्त साधला. विविध विकासकामांचे उद्घाटन आणि शुभारंभ केला. (Latest Political News)

Madhya Pradesh Politics
Kamal Nath News : कमलनाथ काँग्रेसच्याच अंगणात? 'हात' सोडणार नाही; भेटीनंतर पक्षनेत्याचा दावा!

छिंदवाडा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी या ठिकाणी रोड शो केला. त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव केला. या वेळी झालेल्या सभेत छिंदवाडास्थित काँग्रेस राज्य कमिटीचे सरचिटणीस अज्जू ठाकूर, एका नगरपालिकेचे अध्यक्ष संदीप घाटोडे, विविध गावांचे 16 सरपंच आणि इतरही 32 पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपत (BJP) जाणारे सर्व काँग्रेस नेते हे कमलनाथ यांचे कट्टर समर्थक होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com