Delhi News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. त्यांचे जवळचे समर्थकही आता दिल्लीत पोहोचले आहेत. कमलनाथ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या शक्यतांना उधाण आले असतानाच आता यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचे नेते सज्जन सिंह वर्मा यांनी कमलनाथ यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी सांगितले की, कमलनाथ काँग्रेस पक्ष सोडण्याच्या विचारात नाहीत. (Latest Marathi News)
कमलनाथ यांच्याशी दिल्लीत भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते सज्जन सिंह वर्मा म्हणाले, "कमलनाथ यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.कमलनाथ यांनी मला सांगितले की, सध्या त्यांचे लक्ष मध्य प्रदेशातील 29 लोकसभा जागांवर जातीय समीकरणे कशी सोडवायची यावर आहे. कमलनाथ यांनी (पक्ष सोडण्याबाबत) कोणताही विचार केलेला नाही. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहेत. त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्यासह जवळपास बारा आमदार, तसेच माजी आमदारांना सोबत घेऊन ते काँग्रेसला भगदाड पाडणार असल्याची चर्चा रंगत होती.
कमलनाथ यांनी शनिवारी दिल्ली गाठल्यानंतर त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाबाबत चर्चांना अधिकच उधाण आले होते. त्यातच नुकलनाथ यांनी आपल्या एक्स हँडलवरून काँग्रेसचा (Congress) उल्लेख हटवल्यानंतर त्यात अधिकच भर पडली. तर भाजपच्या एका प्रवक्त्याने कमलनाथ व नुकलनाथ यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो ट्विट करत जय श्रीराम म्हटले. या घडामोडींमध्ये काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.