Kunal Kamra : कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना पुन्हा चकवा; अटकेसाठी आणखी वाट बघावी लागणार!

Kunal Kamra On Eknath Shinde Controversy : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून मद्रास हायकोर्टाने दिलासा दिला आहे. यामुळे आणखीन काही दिवस मुंबई पोलिसांना वाट पाहावी लागणार आहे.
Kunal Kamra
Kunal KamraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त भाष्य केलं होते. त्यावरून त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी चार वेळा समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला आज दिलासा संपणार असल्याने त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. तर कधीही कामराला अटक होण्याची शक्यता होती. पण पुन्हा एकदा कामराने मुंबई पोलिसांना चकवा देण्यात यश मिळवले आहे. कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. कामराने मद्रास उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना टीका केली होती. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर व्यंगात्मक टीका करताना एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. यानंतर कामरा याच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. तर त्याचा ज्या स्टुडिओत शो झाला होता. तो फोडला होता.

यानंतर या प्रकरणात कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार देण्यात आली असून कामराला तीन समन्स बजावण्यात आले होते. तर चौथाही समन्स पाठवण्यात आला होता.

Kunal Kamra
Kunal Kamra : कुणाल कामराला दिलासा द्यायला मद्रास हायकोर्टाचा नकार; मुंबई पोलीस कोणत्याही क्षणी उचलण्याची शक्यता

दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर करत मुंबई पोलिसांना झटका दिला होता. तर कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. ज्याची आज मुदत संपणार होती. यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Kunal Kamra
Kunal Kamra : शिवसेना नेत्याचं एकच पत्र अन् कुणाल कामरा झाला कलाकारांच्या यादीतून बाद

पण मद्रास उच्च न्यायालयाने कामराला पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला असून त्याचा अंतरिम अटकपूर्व जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिलं आहे. दरम्यान कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. सध्या स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर मुंबई उच्च न्यायालय कामराच्याबाबत कोणता निर्णय घेतं याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com