
Maharashtra Politics : कुणाल कामरा शनिवारी मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. कॉमेडियन कामरा पोलिसांच्या समन्ससमोर हजर न होण्याची ही तिसरी वेळ आहे. २ एप्रिलला त्याला तिसरे समन्स पाठवण्यात आले होते. आणि ५ एप्रिलला हजर राहण्यास सांगितले होते.
दरम्यान कुणाल कामराला आणखी एक दणका बसला आहे. तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शोने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचे नाव आपल्या सेल आणि आर्टिस्टच्या यादीतून हटवले आहे. सोबतच कामराशी संबंधित सर्व कॉन्टेंट वेबसाईटवरून काढून टाकले आहे. शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी तसा दावा केला असून तशी माहिती दिली आहे.
उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्यानंतर शिवसेना नेते राहुल कनाल यांनी ३ एप्रिलला Book My Show ला पत्र लिहून त्याची तिकिटे विक्री न करण्याची मागणी केली होती. कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडखोरीवर टिप्पणी केली होती. आता बुक माय शो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने त्याच्याशी संबंधित सर्व कॉन्टेंट काढून टाकला असून कलाकारांच्या यादीतूनही नाव हटवले आहे.
शिवसेनेच्या राहुल कनाल यांनी बुक माय शो ला पत्र लिहून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या शो ची तिकिटे विकू नयेत, अशी विनंती केली होती. कुणाल कामराच्या शोमुळं शहरातील वातावरण बिघडू शकतं, लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं
राहुल कनाल यांनी पत्रातून कामराचे प्रमोशन करू नये तसंच त्याला व्यासपीठ देऊ नये अशी विनंती बुकमाय शो ला केली होती. त्यांच्या पत्रानंतर बुक माय शो ने कारवाई केली आहे. बुक माय शोच्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.