MS Dhoni : आयपीएस संपत कुमार यांना न्यायालयाचा दणका; धोनीच्या अवमान याचिका प्रकरणात 15 दिवसांचा तुरुंगवास

 IPS Sampat Kumar : न्यायालयाच्या अवमानप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.
MS Dhoni, IPS Sampath Kumar
MS Dhoni, IPS Sampath KumarSarkarnama
Published on
Updated on

Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. प्रसिध्द क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या अवमान याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने संपत कुमार यांना शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. ते तमिळनाडूतील अधिकारी आहेत. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.

न्यायाधीश एस. एस. सुंदर आणि सुंदर मोहन यांच्या खंडपीठासमोर धोनीच्या (MS Dhoni) याचिकेवर अंतिम सुनावणी झाली. हे प्रकरण 2013 मधील आयपीएलच्या (IPL) स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. या प्रकरणाची चौकशी आयपीएस संपत कुमार (IPS Sampath Kumar) यांनी केली होती. त्यांनी या प्रकरणावरून धोनीच्या विरोधात वक्तव्य केले होते. स्पॉट फिक्सिंगमध्य धोनीचा समावेश होता, असा आरोप त्यांनी केला होता.

MS Dhoni, IPS Sampath Kumar
Lok Sabha Security Breach : …म्हणून अमोल शिंदेच्या बाजूने लढणार! असीम सरोदेंनी सांगितले कारण...

संपत कुमार यांचा विधानानंतर धोनीने उच्च न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. एका खासगी वृत्तवाहिनीविरोधातही याचिका केली होती. या याचिकेनंतर न्यायालयाने संपत आणि इतरांना धोनीविरोधात न बोलण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये संपत आणि मानहानीचा दावा रद्द करण्याची लेखी मागणी केली होती. या याचिकेतून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धोनीने याच अर्जाचा वापर करून पुन्हा न्यायालयाच्या मानहानीचा दावा दाखल केला होता. संपत यांनी केलेल्या लेखी मागणीमध्ये नमूद मुद्यांमुळेही आपल्या मान-सन्मानाला हानी पोहचत आहे. हा न्यायालयाचाही अवमान मानावा, अशी अपेक्षा धोनीने याचिकेत व्यक्त केली होती. या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने संपत यांना 15 दिवसांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

MS Dhoni, IPS Sampath Kumar
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

दरम्यान, धोनीही स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मार्च 2019 मध्ये त्याने म्हटले होते की, 2013 मधील काळ माझ्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता. मी कधीच एवढा निराश झालो नव्हतो. 2007 मधील विश्वचषक स्पर्धेवेळी निराशा आली होती. कारण आणि साखळीतच हरलो होतो. खूप खराब खेळ खेळलो होतो. पण 2013 मध्ये स्थिती खूप वेगळी होती. लोक मॅचफिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगची चर्चा करत होते. चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांची बंदी होती.

(Edited By - Rajanand More)

MS Dhoni, IPS Sampath Kumar
Chhagan Bhujbal : मी फार मोठी लोकं अंगावर घेतलीत, तू किस झाड की पत्ती है! भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com