Mahadev Jankar : राहुल गांधींकडून मिळालेल्या सन्मानाने महादेव जानकर भारावले; राजकीय वाटचालीबद्दलही केले सूचक विधान

Maharashtra Politic's : राहुल गांधी यांनी आम्हाला चांगला रिस्पेक्ट दिला. पार्टी कार्यालयात न बोलवता त्यांच्या घरी बोलावलं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जशी सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे, तशी राहुल गांधी यांनी आम्हाला वागणूक दिली आहे.
Mahadev Jankar-Rahul Gandhi
Mahadev Jankar-Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 06 May : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधींकडून मिळालेल्या आदराच्या वागणुकीमुळे जानकर हे प्रचंड भारावल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधींकडून मिळालेल्या सन्मानाच्या वागणुकीबद्दल जानकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. हे सांगताना त्यांनी आगामी राजकीय वाटचालीबद्दल सूचक विधानेही केली आहेत. त्यामुळे जानकरांची वाटचाल काँग्रेस आघाडीकडे होताना दिसून येत आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीबाबत माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, आमचा एक पक्ष असून युती किंवा आघाडीत एखाद्या पक्षाला जी वागणूक मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि विधानसभा निवडणुकीपासून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. विधानसभेला भाजपने आम्हाला विचारलेच नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत आल्यानंतर भाजपला छोट्या पक्षांची गरज वाटली नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं नसावं.

आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत १०० उमेदवार उभे केले होते. तेथून आमची भाजपपासून फारकत सुरू झाली. पर्याय निवडत गेलं पाहिजे, पण आज कोणत्याही निवडणुका नाहीत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास आपण राहुल गांधी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे, असेही महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, राहुल गांधी यांनी आम्हाला चांगला रिस्पेक्ट दिला. पार्टी कार्यालयात न बोलवता त्यांच्या घरी बोलावलं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जशी सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे, तशी राहुल गांधी यांनी आम्हाला वागणूक दिली आहे. त्याबद्दल मी राहुल गांधी यांचे आभार मानतो.

Mahadev Jankar-Rahul Gandhi
Chandrakant Raghuwanshi : छातीवर धनुष्य-बाण लावला पण आमदाराच्या 'मनातून' काँग्रेस जाईना... 'भिंतीवर' अजूनही सोनिया गांधी, राहुल गांधी अन् शरद पवारांचे फोटो

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशीही सोमवारी माझं बोलणं झालं आहे. राहुल गांधी आणि अखिलेश हे दोघं येणार आहेत. त्याचपद्धतीने मी तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही भेटणार आहे. यात राजकारणाचा कोणताही प्रश्न नाही. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे सामाजिक पाऊल टाकलेले आहे, त्यात कुठलेही राजकीय पाऊल नाही, असाही खुलासा जानकर यांनी केला.

महादेव जानकर म्हणाले, माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. एखाद्या पक्ष खांद्यावर चढतो, तेव्हा तो खालच्याला दाबतो आणि वर निघून जातो. तसा भाजपचा अनुभव शिंदे आणि अजितदादांनाही काही दिवसांनी येईल. आम्ही आपलं दोन हात दूर राहिलो. आम्हालाच भाजपनं त्यांची दारं बंद केली आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचे दार वाजवायला परत जाणार नाही. तसेच, लगेच त्यांच्यावर टीकाही करणार नाही. राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे, त्यानुसार आम्ही वेळ साधली आहे.

Mahadev Jankar-Rahul Gandhi
Maharashtra Politic's : सदाभाऊंचा राऊतांना गावरान दणका; अजितदादांना मुख्यमंत्री करणं म्हणजे ‘येरं माझ्या मागल्या अन्‌ ताक-कण्या चांगल्या...’

भाजपला जर १४५ जागा महाराष्ट्र विधानसभेत जिंकायच्या आहेत, तर आमच्या पक्षानेही ते स्वप्न का बघू नये?. राहुल गांधी यांनीही कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे. तसेच, जातीच्या बाबतही आमचं बोलणं झालं. काय गोष्टी असतील तर मला थेटपणे सांगत जावा, असंही त्यांनी सांगितलं आहे, असेही जानकर यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com