
Nashik, 05 May : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद चर्चेत आले आहे. त्या ऑफरचा महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. हवेतील बार उडविण्याचे काम केले जात आहे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
सदाभाऊ खोत (Sadabahu Khot) म्हणाले, राज्यात मध्यंतरी महाविकास आघाडीचं अडीच वर्षे सरकार आलं होतं, ते सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टेकूवरच आलेलं होतं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री का केलं नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. येरं माझ्या मागल्या आणि ताक-कण्या चांगल्या या गावाकडच्या म्हणीनुसार हवेतील बार उडवत राहण्याचे काम केले जात आहे.
महायुती एवढी सक्षम आणि भक्कम आहे की, पाच वर्षे कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, एवढं मोठं बहुमत महायुतीकडे (Mahayuti) आहे. जे नटलेले आहेत, त्यांना फटक्याने माझ्याकडे ये आणि माझ्या निवाऱ्याला उभं राहा, असा हा प्रकार आहे, असा टोमणा सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता काँग्रेस फोडा, असे विधान केले आहे. त्यावर सदाभाऊ म्हणाले, एक आहे की, कोणताही पक्ष त्यांचा विस्तार करतच असतो. बावनकुळे यांच्या रुपाने अतियश कणखर महसूल मंत्री मिळाला आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मी अनेक महसूल मंत्री बघितले आहेत. पण बावनकुळेंसारखा प्रश्न जाणून घेऊन शेतकऱ्यांना फायदा होणार असेल तर ते तातडीने ऑन दी स्पॉट निर्णय घेत असतात.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक नेते सुसाट सुटले होते. राजकारणात फोडाफोडीच्या राजकारणाला कोण बळी पडतं. जे त्या पटलावरील खेळाडू आहेत, तेच इकडं तिकडं उड्या मारत असतात. सत्ता बदलली की काही जण पटापट उड्या मारायला लागतात. पक्षनिष्ठा वैगेरे काही नसते, जिकडं सत्ता तिकउं हे लोक उड्या मारत असतात. त्यामुळे जनता इकडे तिकडे उड्या मारणाऱ्याकडे लक्ष देत नसते, असा दावाही खोत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.