Vice President News : अखेर उपराष्ट्रपतीपदासाठी NDA चा उमेदवार ठरला; महाराष्ट्र अन् तमिळनाडू कनेक्शन...

NDA Selects C.P. Radhakrishnan : पुढील महिन्यात ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव एनडीएचे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate.
PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate. Sarkarnama
Published on
Updated on

Vice President Election News : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी 'एनडीए'कडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत उमेदवाराचे नाव जाहीर केले.

भाजपच्या संसदीय बोर्डाची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यापूर्वीच एनडीएने पंतप्रधान मोदी आणि नड्डा यांच्यावर उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी दिली होती. या बैठकीत सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

राधाकृष्णन हे मुळचे तमिळनाडूतील असून मागील 40 वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पुढील वर्षी तमिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी निश्चित करत भाजपने एकप्रकारे राजकीय डाव टाकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate.
Election Commission News : मुख्य निवडणूक आयुक्तांचा राहुल गांधींना अल्टिमेटम; दिली 7 दिवसांची मुदत...

जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राधाकृष्णन यांच्या नावावर एनडीएतील सर्व पक्षांनी संमती दिली आहे. तसेच याबाबत विरोधकांशीही चर्चा केली जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी विरोधकांनी राधाकृष्णन यांच्या नावाला संमती द्यावी, यासाठी चर्चा केली जाणार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate.
SC Reservation : मोठी बातमी : महाराष्ट्रात SC आरक्षणात उपवर्गीकरण लागू? ‘वंचित’च्या दाव्याने खळबळ

दरम्यान, इंडिया आघाडीने यापूर्वीच या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उमेदवार कोण असेल, यावरून आपण निवडणूक लढणार की नाही, हे ठरवू असे आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता राधाकृष्णन यांचे नाव पुढे करण्यात आल्याने विरोधक काय भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com