Rahul Gandhi : मोदींकडून महाराष्ट्रात चॅलेंज, राहुल गांधींनी संविधान दिनी दिल्लीत घेतलं सावरकरांचं नाव

Congress Indian Constitution PM Narendra Modi : दिल्लीत आयोजित संविधान रक्षक अभियान कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा नारा दिला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना एक चॅलेंज दिले होते. काँगेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चांगले बोलून दाखवावे, असे आव्हान पंतप्रधानांनी दिले होते. त्यांनी राहुल यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा झाल्या, पण त्यांनी एकदाही सावरकरांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. अखेर मंगळवारी त्यांनी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान सावरकरांवर भाष्य केले.

राहुल गांधी यांच्याकडून यापूर्वी अनेकदा सावरकरांवर टीका करण्यात आली आहे. त्यावरून मोदींनी राहुल यांना आव्हान दिले होते. मंगळवारी दिल्लीतील तालरकोटा स्टेडियमवर आयोजित संविधान रक्षक अभियान कार्यक्रमात संविधानावर बोलताना राहुल यांनी सावरकरांना लक्ष्य केले.

Rahul Gandhi
Digital Arrest : पंतप्रधान मोदींना ज्याची भीती ते जोमात सुरू; ED ची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेचे 3.8 कोटी लुटले

संविधान हे एक पुस्तक नाही. हा हिंदूस्तानचा हजारो वर्षांचा विचार आहे, असे सांगत राहुल गांधी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, गौतम बुध्द, महात्मा गांधी यांच्या सामाजिक सक्षमीकरणाचा विचार यामध्ये आहे. कोणत्याही राज्यांत गेला तरी अशा दोन-तीन नावे मिळतील, ज्यांचे विचार संविधानामध्ये आहे.

उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना राहुल म्हणाले, मी तुम्हाला विचारतो, यामध्ये सावरकरांचा आवाज आहे का? यामध्ये कुठे लिहिले आहे का की, हिंसा करायला हवी. एखाद्या व्यक्तीला मारायला हवे, घाबरवायला हवे, असे या पुस्तकात लिहिले आहे का? खोटे बोलून सरकार चालवायला हवी, असे लिहिले आहे का? हे पुस्तक सत्य आणि अहिंसेचे आहे. हिंदूस्तानचे हे सत्य आहे आणि अहिंसेचा मार्ग दाखवते.

Rahul Gandhi
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री ठरले 'लक फॅक्टर'! महायुतीतील प्रचार ठरला लाभदायी

काही दिवसांपूर्वी तेलंगणात जातनिहाय जनगणना सुरू केली. आमचे सरकार जिथे जिथे येईल, तिथे ही जनगणना केली जाईल. या देशात 90 टक्के लोकांवर अन्याय होत आहे. ते संपवण्यासाठी जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे नेणे, हा पर्याय असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com