Gandhi Statue: लाजिरवाणं! म. गांधींच्या हातात भाजपचा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी अन् गळ्यात उपरणं; NDA च्या मेळाव्यादरम्यान कृत्य

Gandhi Statue BJP Mask: मुजफ्फरपूरमधील मीनापूर भागात एनडीएच्या शिबिरादरम्यान मीनापूर हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.
Mahatma Gandhi Statue, Bihar
Mahatma Gandhi Statue, Bihar
Published on
Updated on

Gandhi Statue BJP Mask: बिहारमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची शिबीरं मेळावे घेतले जात आहेत. अशा भाजपप्रणित एनडीएनं घेतलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे. मुजफ्फरपूरमधील मीनापूर भागात एनडीएच्या शिबिरादरम्यान मीनापूर हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.

Mahatma Gandhi Statue, Bihar
Nagpur ZP: जिल्हा परिषदेच्या शून्य आरक्षणावर कोर्टानं वाढवली धडधड, निकाल ठेवला राखून

महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या डोक्याला भाजपचा झेंडा गुंडाळण्यात आला. तसंच गळ्यात भाजपचं उपरणं आणि हातातल्या काठीवर भाजपचा झेंडा लावण्यात आला. हे दृश्याचे फोटो समोर आल्यानंतर ते अत्यंत लाजीरवाणं वाटत होतं. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर युजर्सनं हे अत्यंत हीन दर्जाचं कृत्य असल्याचं म्हणतं भाजपवर टीका केली. तर काहींनी या कृत्याचं समर्थनही केलं आहे. पण या प्रकारामुळं बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mahatma Gandhi Statue, Bihar
Laxman Hake: "बहुजनांचं शोषण करणारा काळाकुट्ट चेहरा..."; आंतरजातीय विवाहाच्या विधानवर हाकेंचं स्पष्टीकरण

राजदनं गंगाजलनं धुतला पुतळा

या घटनेची माहिती कळताच मीनापूरचे राजदचे आमदार मुन्ना यादव यांनी यावर कठोर शब्दांत आक्षेप नोंदवला. तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांनी महात्मा गांधींचा पुतळा गंगाजलनं धुतला त्यानंतर त्यांना पुष्पहार अर्पण केला आणि घोषणाबाजीही केली. ही घटना अत्यंत लाजीरवाणी असल्याचं सांगत बापूंचा अपमान सहन करण्यापलिकडचा असल्याचं म्हटलं आहे. मला या घटनेमुळं दुःख झालं असून मी त्यांची प्रतिमा गंगाजलनं धुतली आणि त्यांची माफी मागितली असंही त्यांनी म्हटलं. 'बापू हम शर्मिंदा है, आपके कातिल जिंदा है' अशी घोषणाबाजी यावेळी त्यांनी केली. त्यामुळं प्रकरणावरुन राजकारणही सुरु झाल्याचं पाहायला मिळालं.

Mahatma Gandhi Statue, Bihar
Manorama Khedkar: मनोरमा खेडकरांवर पुण्यात गुन्हा दाखल! अपहरण प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

दरम्यान, याप्रकरणी राजदचे आमदार मुन्ना यादव यांनी मीनापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात लोकांविरोधात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याची तक्रार दिली. या घटनेमुळं राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. ज्या एनडीएच्या मेळाव्यादरम्यान ही घटना घडली या मेळाव्यात भाजपचे वरिष्ठ नेते शाहनवाज हुसैन आणि संजय झा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. पण हे कृत्य नेमकं कोणी केलं? हे अद्याप कळू शकलेलं नाही, पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com