Mahua Moitra : खासदारकी गेली, आता मोईत्रांना बंगल्यावरही पाणी सोडावे लागणार? न्यायालयात काय घडले ?

Mahua Moitra's plea in Delhi High Court Hearing Adjourned : बंगल्यासाठी महुआ मोईत्रांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, पण...
Mahua Moitra
Mahua MoitraSarkarnama
Published on
Updated on

TMC leader Mahua Moitra Moves Delhi HC : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. यानंतर महुआ मोईत्रा यांना दुसरा मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. त्यांना दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसीला मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण या याचिकेवरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याने मोईत्रा यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही.

महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय सुनावणी घेऊ शकत नाही. सरकारी बंगला रिकामा करण्याच्या नोटीसीला स्थगिती द्यावी, अशी मागणी मोईत्रा यांनी याचिकेतून केली आहे.

Mahua Moitra
Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांना मोठा धक्का; अखेर लोकसभेची खासदारकी रद्द

'7 फेब्रुवारीपर्यंत बंगला रिकामा करा'

11 डिसेंबरला महुआ मोईत्रा यांना संबंधित विभागाकडून बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली. लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्याने मोईत्रा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. हा आदेश रद्द करावा तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत पर्यायी स्वरुपात निवासात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मोईत्रा यांच्याकडून करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

3 जानेवारीला होणार सुनावणी

व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेट वस्तू स्वीकारणे आणि त्यांच्याशी संसदेच्या (Parliament) वेबसाईटवरील आपला युजर आयडी आणि पासवर्ड शेअर करण्याच्या अनैतिक वर्तनाबद्दल महुआ मोईत्रा यांना दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणी 8 डिसेंबरला मोईत्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. या निर्णयाविरोधात महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

(Edited By Sachin Fulpagare)

Mahua Moitra
Uddhav Thackeray : " मध्य प्रदेशात शिवराज सिंहाना बदललं तसं मोदींनाही..."; उद्धव ठाकरेंचं दिल्लीतून सूचक विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com