TVK Petition: बहुमत गाठलं! काँग्रेससह डाव्या पक्षांचा TVKला पाठिंबा तरीही राज्यपाल सत्तास्थापनेचं निमंत्रण देईनात; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

टीव्हीकेनं काँग्रेससह डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा गाठला असल्यानं तामिळनाडूतला सत्तेचा खेळ आता सोपा झाला आहे. पण राज्यपालांच्या भूमिकेमुळं सत्तास्थापनेवर अद्याप निर्णय झालेला नाही.
TVK Vijay
TVK Vijay
Published on
Updated on

TVK Petition: टीव्हीकेनं काँग्रेससह डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा गाठला असल्यानं तामिळनाडूतला सत्तेचा खेळ आता सोपा झाला आहे. पण राज्यपालांच्या भूमिकेमुळं सत्तास्थापनेवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळं आता टीव्हीकेच्या एका सदस्यानं वैयक्तिकरित्या थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळं आता राज्यपाल स्वतःहून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात की सुप्रीम कोर्टालाच त्यांना तसे निर्देश द्वावे लागतात हे पाहावं लागणार आहे.

TVK Vijay
Calcutta High Court: राहुल गांधींचा कडाडून विरोध असलेल्या प्रकरणात केंद्र सरकारला पहिला झटका; बंगालमधून आली मोठी बातमी...

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

तमिझगा वेट्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाच्या एका सदस्यानं सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली आहे. या पिटिशनमध्ये अर्थात याचिकेत त्यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली की, कोर्टानं तामिळनाडूच्या राज्यपालांना निर्देश द्यावेत की त्यांनी अभिनेता विजय यांच्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावं. कारण तो सर्वात मोठा पक्ष असून त्यांनी राज्यात सत्ता स्थापन करावी.

डाव्यांचाही टीव्हीकेला पाठींबा जाहीर

दरम्यान, एकूण २३४ जागांच्या विधानसभेत १०८ जागा जिंकून टीव्हीके पक्ष तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्याला बहुमताचा आकडा ११८ गाठता आलेला नाही. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यानुसार, स्थिर सरकार स्थापन व्हावं यासाठी काँग्रेसनं ५ जागांसह सुरुवातीलाच पाठिंबा जाहीर केला. पण तरीही त्यांना काही जागा कमी पडत असल्यानं आज अखेर दोन्ही डाव्या पक्षांनी अर्थात भाकप आणि माकपनं प्रत्येकी २ जागांसह टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. तसंच व्हीसीके या पक्षानं २ जागांसह पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं आता बहुमताचा आकडा पार झाला आहे. त्यामुळं खरंतर अभिनेता विजयचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

TVK Vijay
DMK Letter: तामिळनाडूच्या सत्ताखेळाचा पहिला झटका! DMK इंडिया आघाडीतून बाहेर? लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

टीव्हीकेचा इन्कार

दरम्यान, टीव्हीकेनं अशा प्रकारे याचिका दाखल केल्याचा इन्कार केला आहे. पक्षानं म्हटलं की, आम्ही पक्ष म्हणून सुप्रीम कोर्टात अशी कुठलीही याचिका दाखल केलेली नाही. आमच्या पक्षाच्या एका सदस्यानं ती दाखल केली आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com