DMK Letter: तामिळनाडूच्या सत्ताखेळाचा पहिला झटका! DMK इंडिया आघाडीतून बाहेर? लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

DMK Letter: तामिळनाडूत डीएमकेची सत्ता उलथवून लावत टीव्हीकेनं सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत, या टीव्हीकेला काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे. या कारणामुळं आता इंडिया आघाडीत फुटीची ठिणगी पडली आहे.
India Alliance
India Alliance
Published on
Updated on

DMK Letter: तामिळनाडूत डीएमकेची सत्ता उलथवून लावत टीव्हीकेनं सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत, या टीव्हीकेला काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे. या कारणामुळं आता इंडिया आघाडीत फुटीची ठिणगी पडली आहे. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना काँग्रेसविरोधात पत्र लिहीलं आहे. त्यामुळं आता इंडिया आघाडीतून डीएमके बाहेर पडणार असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळं तामिळनाडूत सुरु असलेल्या सत्तेच्या खेळाचा हा पहिला झटका असल्याचंही बोललं जात आहे.

India Alliance
TCS Case: निदा खानच्या अटकेसाठी पोलिसांनी टाकलं होतं जाळं; फिल्मी स्टाईलनं मारली रेड! वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी

नेमका विषय काय?

तामिळनाडूत काँग्रेसनं थलापती विजय यांच्या टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. पण काँग्रेसनं हे करणं डीएमकेला रुचलेलं नाही. कारण तामिळनाडूत डीएमकेची सत्ता होती ती खाली खेचून टीव्हीकेनं सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळं इंडिया आघीडातील महत्वाचा घटकपक्ष असलेल्या डीएमकेच्या हे जिव्हारी लागलं आहे. त्यातच डीएमकेसोबत युतीत निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसनं या युतीविरोधात निवडणूक लढवणाऱ्या टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं डीएमकेचा कडेलोड झाला असून लोकसभेत काँग्रेससोबत एकत्रित बसणाऱ्या डीएमकेनं आता आपल्या खासदारांना वेगळी बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी केली आहे.

India Alliance
Tamilnadu Politics: तमिळनाडूत ‘लॉटरी किंग’ कुटुंबाला राजकीय 'लॉटरी'; पक्ष कोणताही असो, जिंकणार मात्र ‘मार्टिन’च!

कनिमोझींनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

डीएमकेच्या खासदार कनिमोझी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, मी आदरपूर्वक विनंती करते की, लोकसभेतील डीएमकेच्या खासदारांच्या बसण्याच्या व्यवस्थेत योग्य ते बदल करण्यात यावेत. सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळं आणि काँग्रेससोबतची आमची आघाडी तुटण्याच्या स्थितित असल्यानं आमच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांसोबत एकत्रित बसणं हे योग्य नाही.

दरम्यान, या पत्रात कनिमोझी यांनी आमची काँग्रेससोबतची युती ही शेवटाकडं आली असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळं तामिळनाडूतील बदललेल्या राजकीयपरिस्थितीमुळं काँग्रेसला आणि पर्यायानं इंडिया आघाडीला झटका बसल्याचं मानलं जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com