

पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठा विजय मिळवत तृणमूल काँग्रेसला धक्का दिला
अमित शाह यांच्या रणनीतीसह अनेक नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
सुवेंदू अधिकारी, भूपेंद्र यादव, सुनील बन्सल यांच्या कामगिरीची चर्चा
BJP Registers Big Win In West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.४) झाली. यावेळी झालेल्या तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या थेट लढतीत अखेर भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजपने बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. या धक्का त्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या तीन मोहऱ्यांनी दिला असून सध्या त्यांची जोरदार चर्चा देशभर होताना दिसत आहे. ज्यात भूपेंद्र यादव आणि सुनील बन्सल यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर भाजपच्या या प्रचंड विजयामागे अमित शाह यांची कूटनीति, भूपेंद्र यादव 'मास्टर प्लॅनj', सुनील बन्सल यांचा 'सायलेंट स्ट्रायकर' आणि अमित मालवीय यांच्या 'डिजिटल आर्मी'ने बंगालमध्ये कमळ फुलले आहे.
देशात झालेल्या पाच राज्यातील निवडणुकींच्या निकालात पश्चिम बंगालमध्ये झालेले सत्तांतर सर्वांनाच चकित करणारे आहे. येथे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. ज्यात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. तर गेल्या १५ वर्षात जे भाजपला शक्य झाले नाही, ते यंदा २०२६ मध्ये ममतांचा अभेद असणारा गड भाजपने भेदला. भक्त गडच भेदला नाही तर सर्वाधिक जागा जिंकत इतिहासही रचला आहे. या विजयाची आता जगभर चर्चा होत असतानाच आता विजयाचे खरे शिल्पकार आणि ते चेहरे समोर येताना दिसत आहेत. ज्यांनी ममता बॅनर्जी यांचा गट नेस्त नाबूत केला आणि कमळ फुलवले.
अमित शाहांचा डाव
गेल्या १५ वर्षापासून जो प्रयत्न भाजप करत होती तो आता सत्यात आला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला विजय मिळवून देण्यासाठी रणनीती आखली. त्यांनी मागील रणनीती पूर्णपणे बदलत सभांऐवजी प्रत्येक बूथ आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली.
२०२१ च्या निवडणुकीत भाजपला ३८% मते मिळूनही, केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर टीएमसीला ४८% मते मिळवून त्यांनी २१५ जागा जिंकल्या होत्या. या गोष्टी लक्षात घेऊनच भाजपने वैयक्तिक हल्ले किंवा केवळ हिंदुत्ववादी घोषणांवर लक्ष केंद्रित न करता, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था आणि घुसखोरी यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर भर देण्याचे ठरवले. फक्त मुद्देच हाती घेतले नाही तर ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अमित शाह यांनी भूपेंद्र यादव, सुनील बन्सल आणि अमित मालवीय या तीन प्रमुखांची मोट बांधली. त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या.
भूपेंद्र यादव 'मास्टर प्लॅनर'
भूपेंद्र यादव यांची या निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जे त्यांनी अत्यंत गांभीर्याने घेत सप्टेंबर २०२५ पासूनच कोलकाता येथे तळ ठोकला. त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला. रणनीतीमध्ये सातत्याने बदल केला. अनेकदा पहाटे २ वाजेपर्यंत बैठका घेतल्या. प्रत्येक मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि प्रचारासाठी योग्य वेळ ठरवत केंद्रीय नेतृत्व आणि स्थानिक युनिट यांच्यात समन्वय ठेवला. ज्यामुळे आज येथे कमळ फुलले असून त्यांना भाजपचे 'पडद्यामागील रणनीतिकार' म्हणूनही ओळखले जात आहे.
सुनील बन्सल 'सायलेंट स्ट्रायकर'
भाजपसाठी यावेळी सुनील बन्सल यांनी 'सायलेंट स्ट्रायकर' बनत एका विशेष रणनीतिकारची भूमिका बजावली. जेथे काही गोष्टी चुकल्या, तेथे त्या सुधारण्याचे काम त्यांनी केले. महत्वाचे म्हणजे तिकीट देताना निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. थेट ममता बॅनर्जी यांना न भीडता त्यांनी 'तृणमूल'च्या आमदारांविरुद्ध आरोपपत्रे जारी करत त्यांना घेरले. ज्यामुळे 'तृणमूल'ला आपले ७७ उमेदवार बदलावे लागले.
अमित मालवीय यांची 'डिजिटल आर्मी'
अमित मालवीय यांनी यंदा केवळ आयटी सेलचे प्रमुखच नव्हे, तर या निवडणुकीचे सह-प्रभारी म्हणून काम केले. गेल्या पाच वर्षांपासून बंगालच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन रणनीतीवर हातात घेत डीप फेक्स आणि एआय (AI) सारख्या तंत्रज्ञानाचाही वापर केला. प्रत्येक बूथवर 'व्हॉट्सॲप आर्मी' तैनात करत 'मुस्लिम तुष्टीकरण', 'बेकायदेशीर घुसखोरी' आणि 'स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचारा'चे मुद्दे प्रभावीपणे मांडले.
1. पश्चिम बंगालमध्ये कोण जिंकले
भाजपने मोठा विजय मिळवला आहे
2. ममता बॅनर्जी यांना काय धक्का बसला
त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला
3. भाजपच्या विजयामागे कोणाचा हात आहे
अमित शाह यांच्या रणनीतीसह प्रमुख नेत्यांचे योगदान आहे
4. कोणत्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
सुवेंदू अधिकारी, भूपेंद्र यादव आणि सुनील बन्सल
5. या निकालाचा काय परिणाम होऊ शकतो
राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.