ममतांचा दे धक्का! भाचे अभिषेक बॅनर्जी अन् प्रशांत किशोर यांचेच छाटले पंख

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची (Civic Polls) रणधुमाळी सुरू आहे.
Mamata Banerjee,Abhishek Banerjee and Prashant Kishor 

Mamata Banerjee,Abhishek Banerjee and Prashant Kishor 

Sarkarnama

Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची (Civic Polls) रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या निवडणुकांतील उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याचवेळी त्यांनी भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे पंख छाटले आहेत.

राज्यात आगामी 111 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकांबाबत अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांनी रणनीती आखली होती. जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पक्षात नेत्यांची तरुण फळी तयार व्हावी, हा उद्देश ठेवून त्यांनी हे धोरण आखले होते. यासाठी या दोघांनी काही तरुण चेहरेही हेरून ठेवले होते. या प्रस्तावावर फक्त ममता बॅनर्जी यांच्याकडून शिक्कामोर्तब होणे बाकी होती.

ममतांसमोर हा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. त्यांनी तरुण चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी निवडून येण्याची क्षमता असलेल्या जुन्या नेत्यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाचे अभिषेक आणि किशोर यांना बाजूला करीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या शिफारशी आणि त्यांनी सुचवलेली नावे यावर विचार होईल, अशी भूमिका घेतली आहे. पक्षात ममतांच्या नंतर अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि किशोर यांचे पक्षातील महत्वही अनन्यसाधारण आहे. असे असताना ममतांनी त्यांना डावलल्याचे समोर येत आहे. एकप्रकारे ममतांनी या दोघांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>Mamata Banerjee,Abhishek Banerjee and Prashant Kishor&nbsp;</p></div>
नवीन वर्षातही पेट्रोलियम कंपन्यांनी वाहनचालकांना खूष करणं कायम ठेवलं!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत नुकताच कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

<div class="paragraphs"><p>Mamata Banerjee,Abhishek Banerjee and Prashant Kishor&nbsp;</p></div>
राणेंची मुलासाठी माघार? थेट राजकीय निवृत्तीचा टाकला बॉम्ब

नुकत्याच झालेल्या कोलकता महापालिकेच्या निवडणुकीत 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या आहेत. आता महापौरपदी हकीम यांची निवड झाली आहे. कोलकता महापालिकेचे 39 वे महापौर म्हणून लवकरच ते शपथ घेतील. स्वांतत्र्यानंतर महापौरपदी विराजमान होणारे ते पहिले मुस्लिम ठरतील. हकीम हे महापालिकेच्या 82 क्रमांकाच्या वॉर्डमधून निवडून आले आहेत. ते कोलकता बंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आमदार अतिन घोष यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com