भाजपची डोकेदुखी वाढली! बहुमत गाठलं पण मुख्यमंत्र्यांची घराणेशाहीमुळं पडणार विकेट?

मणिपूर विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताच्या आकडा गाठल्याने इतर पक्षांसोबत आघाडीसाठी हात पसरण्याची वेळ भाजपसमोर आलेली नाही. इतर पक्षांशी आघाडी न करता एकला चलो रे ही भूमिकाच या निवडणुकीत भाजपला फायद्याची ठरली आहे. असे असले तरी आता मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला असून, यावरून पक्षनेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह (N.Biren Singh) यांनी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. ते काळजीवाहू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. बिरेनसिंह यांनी पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. याचवेळी असे केल्यास पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना डावलले जाईल, असे पक्षातीलच आणखी एक गट म्हणत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांना मुख्यमंत्रिपदाचा वादावर काहीही स्पष्ट बोलणे टाळून संसदीय मंडळाकडे बोट दाखवले आहे.

बिरेनसिंह यांची घराणेशाहीमुळे अडचण

सिंह यांच्या घराणेशाहीची तक्रार काही विरोधकांनी पक्षाचा केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा घराणेशाहीच्या विरोधातील विजय असल्याचे म्हटले होते. आता नेमका हाच मुद्दा बिरेनसिंह यांचे विरोधक उपस्थित करीत आहेत. बिरेनसिंह यांचे जावई राजकुमार इमोसिंह हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. ते आता सासऱ्यांसाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. ज्येष्ठ नेते व मंत्री थोंगाम विश्वजित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित कोंथाऊजोम गोविंदास हे दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

BJP
मोठी घडामोड : मुख्यमंत्री सावंतांचा राजीनामा; गोव्यात राजकीय हालचालींना वेग

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. भाजपने हा 32 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 5 तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 7, संयुक्त जनता दल 6 आणि नागा पीपल्स फ्रंट 5 जागांवर विजयी झाले आहेत. यातील नागा पीपल्स फ्रंट आणि संयुक्त जनता दल आता भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस हे दोनच विरोधी पक्ष उरणार आहेत.

मणिपूर पक्षनिहाय जागा

भाजप -32

काँग्रेस - 5

नॅशनल पीपल्स पार्टी –7

संयुक्त जनता दल – 6

नागा पीपल्स फ्रंट – 5

BJP
मोदी सरकारचा नोकरदारांना दणका! पीएफवरील व्याजदर ४० वर्षांतील नीचांकी पातळीवर

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह हे 18 हजार मतांनी हेनगांग मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपने इतर स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता काबीज केली होती आणि बिरेनसिंह हे मुख्यमंत्री झाले होते. मणिपूरमध्ये (Manipur Election) दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक झाली. यातील पहिला टप्पा 28 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा 5 मार्चला झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com