
AAP Politics : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा (आप) दारुण पराभव झाला. भाजपने तब्बल 27 वर्षानंतर सत्ता मिळवली. मात्र, सत्तेच्या बाहेर झालेल्या आपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आप दिल्लीनंतर पंजबामध्ये सत्तेत होती. पंजाबमध्ये देखील आप विषयी नाराजी असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आपचे प्रमुख संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षात महत्वाचे बदल केले आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या घरी आपच्या पॉलिटिकल अफेयर्स कमेटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक राज्यातील आपच्या नेतृत्वावामध्ये बदल करण्यात आले. दिल्लीचे अध्यक्ष असलेले गोपाल राय यांच्या जागी सौरभ भारद्वाज यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना पंजाबचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
गोपाल राय यांच्याकडून दिल्लीचे अध्यक्ष पद काढून घेतले असले तरी त्यांच्यावर गुजराच जबाबादारी दिली असून त्यांची गुजरातचे प्रभारी म्हणून करण्यात आली आहे. तर जम्मूच्या अध्यक्षपदी महाराज मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या प्रभारीपदी पंकजा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या पराभवानंतर ते पंजाबमधून राज्यसभेचे सदस्य होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपकडून स्पष्ट करण्यात आले की केजरीवाल राज्यसभेवर जाणार नाही. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे नाव मागे पडले असताना माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचे नाव पंजाबमधून राज्यसभेवर जाण्यासाठी आघाडीवर आहे. मात्र, पक्षाने यावर अजून अधिकृत भूमिका जाहीर केली नाही.
गोवा विधानसभा तसेच पंजाब विधानसभा निवडणूक अजून लांबणीवर आहे. मात्र, दिल्लीतील पराभवानंतर आपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली असून गुजरात आणि पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.