Strait of Hormuz tensions : इराणबाबत काही तासांतच जगाला मिळणार गुड न्यूज; US परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत महत्वाची घोषणा...

Marco Rubio Iran statement : मार्को रुबियो यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवरही महत्वाचे विधान केले. ते म्हणाले, भारत-अमेरिका संबंध अधिक वेगाने पुढे जात आहेत.
Strait of Hormuz tensions
Strait of Hormuz tensionsSarkarnama
Published on
Updated on

Middle East crisis news : अमेरिका आणि इराण युध्दामुळे संपूर्ण जगासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. भारतासह अनेक देशांना इंधन पुरवठ्यात अडथळे येत नसल्याने हे संकट अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे लवकरात लवकर अमेरिका आणि इराणमध्ये समझोता व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी महत्वाची घोषणा करत जगाला गुड न्यूज दिली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीबाबत लवकरच चांगली बातमी मिळणार असल्याचे रुबियो यांनी दिल्लीत बोलताना स्पष्ट केले. होर्मुझ सामुद्रधुनी एक आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग आहे. त्यावर इराण मालकी हक्क दाखवू शकत नाही. पुढील काही तासांत या मुद्दयावर जगाला चांगली बातमी मिळू शकते, असे रुबियो यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे होर्मुझ मार्ग खुला करण्याबाबत अमेरिका आणि इराणमध्ये समझोता झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

इराणमधील युरेनियमबाबतही वाद आहे. त्यावर बोलताना रुबियो म्हणाले, इराणचा अणु कार्यक्रम खूप तांत्रिक विषय आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल. त्याबाबत अमेरिका कोणताही समझोता करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही तासांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान समोर आले होते. अमेरिका, इराण आणि अन्य काही देशांमध्ये एक समझोत्यावर व्यापक सहमती बनली आहे. त्याला अंतिम स्वरुप देणे बाकी असल्याची माहिती टॅम्प यांनी सोशल मीडियातून दिली होती.

Strait of Hormuz tensions
Rahul Gandhi prediction : मोदी सरकार वर्षभरातच कोसळणार! राहुल गांधी यांची भविष्यवाणी, कारणही सांगितले...

ट्रम्प यांच्या या विधानानंतर रुबियो यांनी गुड न्यूजबाबत सांगत जगाला काही दिलासा दिला आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुला करण्याला प्राधान्य असेल. संघर्ष सुरू झाल्यानंतर हा मार्ग इराणने जवळपास पूर्णपणे बंद केला होता. या करारामुळे इराणला कच्च्या तेलाच्या विक्रीसाठीही परवानगी मिळू शकते. इराणकडूनही तशी मागणी करण्यात आली आहे.

Strait of Hormuz tensions
Cockroach Janata Party news : अभिजीत दीपके यांनी PM मोदींच्या विश्वासू मंत्र्यांना घेतलं शिंगावर, पुराव्यानिशी दिलं प्रत्युत्तर; क्रॉक्रोच जनता पार्टीला भारतातूनच 'सपोर्ट'

रुबियो यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवरही महत्वाचे विधान केले. ते म्हणाले, भारत-अमेरिका संबंध अधिक वेगाने पुढे जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील व्यापार असंतुलन दूर करण्यावर जोर दिला आहे. अमेरिकेमध्ये भारताची सुमारे २० अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक वाढत चालली आहे. ट्रम्प सरकारच्या काळात दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूर होतील, यावरही रुबियो यांनी जोर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com