
New Delhi News : मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये मोदी सरकारबाबत (Modi Government) केलेल्या विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण भारताची संसदीय समिती META ला मानहानीसंबंधी समन्स बजावणार आहे.
सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गेल्या शुक्रवारी (ता. 10) एका पॉडकास्टमध्ये कोरोनानंतरच्या (Covid 19) परिस्थितीवर भाष्य करताना मोठं विधान केलं होतं. 2024 हे वर्ष जगासाठी अशांततेचं ठरलं. 2024 मध्ये कोविडमुळं सरकारं पडली,हे सत्ताधारी पक्षावरील जनतेचा अविश्वास दर्शवत असल्याचं झुकेरबर्ग यांनी म्हटलं होतं.
मार्क झुकेरबर्ग जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये बोलत होते.यावेळी त्यांनी कोविड-19 साथीच्या आजारानंतर सरकारवर विश्वास राहिला नसल्यासंबंधात भाष्य करत होते.त्यातही गेल्या वर्षात जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घटना घडल्या.त्यात महागाई,कोविडमुळ निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेक देशांतील सत्ताधारी पक्षाला सामना करावा लागला.
भारतासह जगभरातील विविध देशांतील सरकारांनी कोरोनाकाळात राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणांमुळे आणि त्यादरम्यान घडलेल्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम लोकांची नाराजी आणि संताप निवडणूक निकालांत दिसून आला. जगभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या त्या ठिकाणी सत्तेतील सर्व लोक हरले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही निवडणुकीत हरले, असं विधान झुकेरबर्गनं केलं होतं.
झुकेरबर्ग यांच्या याच विधानावरुन आता भारताची संसदीय समितीनं मोठं पाऊल उचललं आहे. ही समिती META ला मानहानीचं समन्स बजावणार आहे. भाजप खासदार आणि कम्युनिकेशन-माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी याबाबतची मोठी अपडेट दिली आहे. चुकीची माहिती पसरवल्याबद्दल 'मेटा'नं माफी मागावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दुबे म्हणाले,आम्ही आम्ही मेटाच्या लोकांना कॉल करणार आहोत.झुकेरबर्ग यांनी कोरोना काळानंतर तेथील सरकारविरोधात वातावरण तयार झाल्याचं विधान करण्यात आलं आहे.त्यात भारताचा समावेश केलेला आहे. मेटावाल्यांना भारत सरकारची माफी मागावी लागणार आहे, अन्यथा आमची समिती कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्ही समिती सदस्यांशी बोलणार असून मेटावाल्यांना 20 ते 24 जानेवारी दरम्यान उपस्थित राहण्यास सांगणार आहोत, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.