

Rajya Sabha Election News : मध्य प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला येथे विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज छाननीत रद्द केला आहे. तर हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद न करणे काँग्रेस उमेदवाराच्या अंगलट आल्याचे आता दिसत आहे.
मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसने भाजप उमेदवार महेश केवट यांच्या विरोधात मिनाक्षी नटराजन यांना उमेदवारी दिली होती. पण आता नटराजन यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तर यामुळे आता तिसऱ्या जागेसाठी होणारी लढतच संपुष्ठात आली असून भाजप उमेदवार महेश केवट यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद केली नाही. यावरूनच भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावत ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र या कालावधीत कोणतेही उत्तर दिले नाही. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. एकमेव उमेदावाराचाही अर्ज बाद झाल्याने हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान भाजपने केलेले आरोप आणि आक्षेप काँग्रेसने फेटाळून लावले असून भाजपचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तर विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी याला "लोकशाहीची हत्या" असे म्हणत भाजपवर संताप व्यक्त केला आहे. तसेच नटराजन यांच्याशी निगडीत हे प्रकरण केवळ एका न्यायालयीन नोटीसशी संबंधित असून याबाबत कोणताही अधिकृतपणे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. तसेच या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही काँग्रेसने म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.