Raja Raghuvanshi Case : हनीमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याने 3 राज्यांची पोलिस यंत्रणा हादरवली; अखेर पत्नीच्या षडयंत्राचा पर्दाफाश

Who Was Raja Raghuwanshi? : मेघालयात गेलेल्या राजा आणि सोनमबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सोनमनेच पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची माहिती मेघालय पोलिसांनी दिली आहे.
Meghalaya honeymoon turns tragic as wife Sonam hires killers to murder husband Raja Raghuvanshi, police confirm.
Meghalaya honeymoon turns tragic as wife Sonam hires killers to murder husband Raja Raghuvanshi, police confirm. Sarkarnama
Published on
Updated on

Police Reveal Shocking Details Against Wife Sonam : मध्य प्रदेशातील इंदौर येथील राजा आणि सोनम रघुवंशी यांचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. दोघे घरातून 20 मेला हनीमूनसाठी मेघालयकडे रवाना झाले. त्यानंतर तीन दिवसांनी दोघेही बेपत्ता झाले. बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमला शोधण्यासाठी मेघालय पोलिसांनी कंबर कसली होती. पोलिसांना 2 जूनला राजाचा मृतदेह सापडतो अन् तिथून पुढे पोलिसांना चक्रावून टाकणारी स्टोरी पुढे येते.

मेघालयात गेलेल्या राजा आणि सोनमबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सोनमनेच पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची माहिती मेघालय पोलिसांनी दिली आहे. पण त्यासाठी त्यांना तब्बल 15 दिवस लागले. या केसमध्ये केवळ मेघालयच नाही तर मध्य प्रदेशसह आता उत्तर प्रदेश पोलिसही सक्रीय झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

राजा आणि सोनम बेपत्ता झाल्यानंतर मेघालय सरकारही हादरले होते. कारण त्याचा फटका पर्यटनाला बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी दोघांचा जोरकसपणे शोध घेण्यास सुरूवात केली. दोन जूनला एका दरीत राजाचा मृतदेह पोलिसांना सापडला. पण सोनमचा मृतदेह किंवा तिची कसलीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती.

Meghalaya honeymoon turns tragic as wife Sonam hires killers to murder husband Raja Raghuvanshi, police confirm.
Trump Vs Musk : बॉस कोण, हे मस्क यांना लवकरच कळेल! ट्रम्प यांनी लावली फिल्डींग…

दरम्यानच्या काळात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून बरीच माहिती गोळा केली होती. यामध्ये सोनमचे वागणे संशयास्पद आढळून येत होते. त्यांच्या आजूबाजूला काही अनोळखी व्यक्तीही दिसत होत्या. त्यामुळे पोलिसांचा सोनमविषयीचा संशय वाढत गेला होता. पण प्रत्यक्षात तिचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसही भांबावले होते.

अखेर सोनम सोमवारी (ता. 9) म्हणजेच पतीचा मृतदेह सापडल्यानंतर आठवडाभराने मध्यरात्री थेट उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील नदगंज पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ढाब्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या ढाब्यावर तिने भावाला फोन करण्यासाठी मोबाईल मागितला होता. पतीची हत्या झाल्याचे आणि आपल्याला लुटल्याचे तिने सांगितले होते. पोलिस तिथे आल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले.

Meghalaya honeymoon turns tragic as wife Sonam hires killers to murder husband Raja Raghuvanshi, police confirm.
India Vs Pakistan : जागतिक बँकेनेच फाडला भिकेला लागलेल्या पाकिस्तानचा बुरखा; भारताला ‘अच्छे दिन’...

प्रेमाचा त्रिकोण

सोनमने प्रियकरासोबत षडयंत्र रचून राजाची हत्या घडवून आणल्याची माहिती मेघालय पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सोनमसह हत्येची सुपारी घेतलेल्या तिघांनाही अटक केली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर मेघालय पोलिसांसह सरकारनेही सुस्कारा सोडला आहे. प्रेमप्रकरणातून ही सुनियोजित हत्या असल्याचे मेघालय पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com