Trump Vs Musk : बॉस कोण, हे मस्क यांना लवकरच कळेल! ट्रम्प यांनी लावली फिल्डींग…

Growing Rift Between Donald Trump and Elon Musk : अमेरिकेच्या राजकारणात सध्या ट्रम्प विरूध्द मस्क अशी लढत सुरू असल्याचे चित्र आहे. मस्क यांच्याकडून उघडपणे अमेरिकेच्या धोरणांवर टीका सुरू करण्यात आली आहे.
Donald Trump and Elon Musk’s public fallout escalates, raising speculation over potential investigations and political consequences.
Donald Trump and Elon Musk’s public fallout escalates, raising speculation over potential investigations and political consequences. Sarkarnama
Published on
Updated on

Impact on US Politics and Tech Industry : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली होती ट्रम्प यांच्या विजयात मस्क यांचा मोलाचा वाटा होता. पण काही महिन्यांतच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. दोघांमधील वाद टोकाला गेला असून ट्रम्प यांनी जुन्या मित्र अडकविण्याची पूर्ण तयारी केल्याचे त्यांच्या निर्णयांवरून दिसत आहे. खरा बॉस कोण आहे, हे दाखवून देण्यासाठी ट्रम्प यांनी फिल्डींग लावल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या राजकारणात सध्या ट्रम्प विरूध्द मस्क अशी लढत सुरू असल्याचे चित्र आहे. मस्क यांच्याकडून उघडपणे अमेरिकेच्या धोरणांवर टीका सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने टेरिफच्या निर्णयामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडेल, असा थेट हल्ला मस्क यांनी चढवला आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनीही त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

ट्रम्प प्रशासनाने मस्क यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. अमेरिकेतील तपास यंत्रणांनी मस्क यांच्याशी संबंधित अनेक फायली व्हाईट हाऊसमध्ये पाठविल्याचे सांगितल जात आहे. जगभरातील श्रीमंत उद्योगपतींपैकी ट्रम्प हे वरच्या क्रमाकांवर आहेत. त्यांच्या विविध कंपन्या असून त्यासंबंधित काही गंभीर प्रकरणांची चौकशी ट्रम्प सरकारकडून केली जाऊ शकते.

Donald Trump and Elon Musk’s public fallout escalates, raising speculation over potential investigations and political consequences.
Sarkarnama Headlines : लोकल अपघातानंतर राज ठाकरे राज्यकर्त्यांवर बरसले; म्हणाले, बोजवारा उडाला...

मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीवर संघीय उद्यान प्रशासनाने साडे साडे सहा डॉलर दंड आकारला आहे. आवश्यक अटी-शर्तींचे पालन न केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. ट्विटर म्हणजेच सध्याचे एक्सचे 2022 मध्ये झालेले अधिग्रहण कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहे. त्याबाबत सिक्युरिटीज अन्ड एक्सचेंज कमिशन आणि मस्कमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे.

मस्क यांची दुसरी कंपनी न्यूरालिंकबाबतही वाद आहे. एक्सने काही जाहिरातदारांविरोधात फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार केली आहे. या कंपन्यांनी जाणिवपूर्वक संघटितपणे एक्सवर बहिष्कार टाकण्याची योजना तयार केली होती, असा आरोप मस्क यांच्या कंपनीने केला आहे. स्पेसएक्स फेडरल कम्युनिकेशन कमिशनकडे सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी नव्या स्पेक्ट्रमची मागणी मस्क यांनी केली आहे. ही मागणी फेटाळली जाऊ शकते.

Donald Trump and Elon Musk’s public fallout escalates, raising speculation over potential investigations and political consequences.
India Vs Pakistan : जागतिक बँकेनेच फाडला भिकेला लागलेल्या पाकिस्तानचा बुरखा; भारताला ‘अच्छे दिन’...

मस्क यांना मिळणारी सरकारी कामेही बंद होऊ शकतात. असे झाल्यास त्यांना तब्बल 3 अब्ज डॉलर एवढे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अद्याप ट्रम्प यांच्याकडून उघडपणे याबाबत काहीही घोषणा केलेली नाही. मात्र, मस्क यांच्या विरोधी भूमिकेमुळे ट्रम्प यांच्याकडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com