Maharashtra News: CM फडणवीसांनी करुन दाखवलं..! तासाभरातच 8 कंपन्यांसोबत करार, 44000 कोटींची गुंतवणूक, 'या' ठिकाणी 7000 नव्या रोजगाराच्या संधी

Maharashtra Government Investment News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवनात बुधवारी(ता.11) आठ मोठ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आठ कंपन्यांच्या प्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि यूएईपेक्षा मोठी करणार असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारनं 30 लाख कोटी रुपयांचं सामंजस्य करार केले असून, राज्य लवकरच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही व्यक्त केला होता. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं यश मिळवलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवनात बुधवारी(ता.11) आठ मोठ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आठ कंपन्यांच्या प्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारनं केलेल्या या आठ कंपन्यांसोबतच्या या करारांमुळे राज्यात सुमारे 44,710 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच 7 हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मितीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. करार केलेल्या कंपन्यांमध्ये डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, एरोस्पेस,हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली यांसह फायबर उत्पादन क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ कंपन्यांसोबत झालेल्या कराराबाबत माहिती देतानाच राज्य सरकारने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असल्याचं सांगितलं. तसेच सरकार आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो, असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव असल्याचं नमूद केलं.

Chief Minister Devendra Fadnavis
ST Mahamandal Recruitment: ...तर सुशिक्षित बेरोजगारांनो लागा तयारीला; एसटी महामंडळात तब्बल 17 हजार 742 पदांची मेगा भरती

प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल. उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळेत मिळाव्यात यासाठीही सरकार प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं दिली आहे.

याचवेळी राज्य सरकारने महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगसमूहांसाठी विश्वसनीय व्यवस्था निर्माण केल्याचा दावाही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केला. तसेच यापुढील काळातही गुंतवणुकदारांचा आपल्या राज्यातील गुंतवणुकीबाबतचा अनुभव हा अडथळाविरहीत असेन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Chief Minister Devendra Fadnavis
Rajya Sabha Election 2026 : मोठी बातमी : काँग्रेस अन् मित्रपक्षाचे 11 आमदार भाजपच्या गळाला? चंद्रशेखर बावनकुळेंवर दिल्लीतून 'खास' जबाबदारी

राज्य सरकारने केलेल्या आठ कंपन्यांसोबतच्या सामंजस्य करारांमुळे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, पुणे आणि अमरावती या ठिकाणी स्टील, माहिती तंत्रज्ञान, अवकाश व संरक्षण साहित्य, वस्त्रोद्योग आणि हरित ऊर्जा यांसह विविध औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीच्या संधीही उपलब्ध होणार आहे.

प्रकल्प व गुंतवणूक :

* एस.एम. स्टील्स अँड पॉवर लि. (सलोरी, चंद्रपूर) यांचा इंटिग्रेटेड स्टील व स्पेशल स्टील कॉम्प्लेक्स - 20,000 कोटी

* इन्फिनिटीटेड फायबर कंपनी (पीएम मित्रा पार्क, अमरावती) यांचा सर्क्युलर फायबर सेंटर - 11,910 कोटी

* रेटाविया प्रा. लि. (नांदेड) यांचा हेलिप्लांट प्रकल्प - 4,250 कोटी

* एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (दिंडोरी, नाशिक) यांचा एसीई गॅसेस, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन - 750 कोटी

* टाटा टेक्नॉलॉजीज लि. (नागपूर, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर) यांचा एरोस्पेस व संरक्षणसंबंधित साहित्य - 4,800 कोटी

* जेके इन्फोटेक (हिंजवडी, पुणे) यांचा डेटा सेंटर ग्रीन इनिशिएटिव्ह - 1,000 कोटी

* कोनार्क सॉफ्टकोर सोल्यूशन्स प्रा. लि. (हिंजवडी, पुणे) यांचा डेटा सेंटर - 1,600 कोटी ,

* ॲडव्हांटेक फ्युएल सिस्टीम प्रा. लि. (सुपा-पारनेर एमआयडीसी, अहिल्यानगर) या हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली - 400 कोटी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com