Mehul Choksi: PNB घोटाळ्यातील फरार मेहुल चोक्सीला भारतात आणणार! सरकारनं सांगितलं तुरुंगात मिळणार 'या' सुविधा

Mehul Choksi Extradition: पंजाब नॅशनल बँकेचं १३,००० कोटी रुपयांचं कर्ज कथित घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपींपैकी एक असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जिअममधून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.
Mehul Choksi
Mehul ChoksiSarkarnama
Published on
Updated on

Mehul Choksi Extradition: पंजाब नॅशनल बँकेचं १३,००० कोटी रुपयांचं कर्ज कथित घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपींपैकी एक असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जिअममधून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. चोक्सीला बेल्जिअममध्ये अटक झाली आहे, त्यानंतर चार महिन्यांनंतर भारतानं तिथल्या सरकारला एक आश्वासन पत्र पाठवलं असून त्यात म्हटलं की, जर मेहुल चोक्सीला भारतात आणण्यात आलं तर त्याला मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात ठेवलं जाईल, तसंच त्याला काही खास सुविधाही देण्यात येतील.

Mehul Choksi
EX MLA Kailas Patil Join Shivsena : एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का, पक्षाचा प्रदेश उपाध्यक्षच फोडला..

गृहमंत्रालयाचं पत्र

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत सीबीआयच्यावतीनं केलेल्या विनंती अर्जानंतर एप्रिलमध्ये बेल्जिअममध्ये त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात बेल्जिअममधील एका कोर्टानं त्याची याचिका फेटाळली होती. गृहमंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी राकेश कुमार पांडे यांनी ४ सप्टेंबर रोजी बेल्जिअमच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका पत्रात म्हटलं की, भारतानं चोक्सीवर भारतात खटला चालवण्यासाठी त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. पांडे यांनी म्हटलं की, चोक्सीच्या प्रत्यार्पणाची कार्यवाही चेंबर्स ऑफ इंडिकेशन यांच्या समोर पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे.

Mehul Choksi
PCMC Election 2025: प्रभागरचनेत बदल नाही; पण, वाढलेला मतदार कोणाला साथ देणार?

तुरुंगात दिल्या जाणार 'या' सुविधा

गृहमंत्रालयानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, महाराष्ट्र सरकारच्या एका अहवालाच्या आधारावर केंद्र सरकारनं हा विश्वास दिला आहे की, मेहुल चोक्सीला मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगाच्या बराक क्रमांक १२ मध्ये ठेवलं जाईल. जर तो दोषी आढळला तर त्याला संभाव्य अटकेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान एका अशा कोठडीत ठेवलं जाईल तिथं त्याला कमीत कमी तीन वर्ग मीटर (32 स्वेअर फूट) इतकी वैयक्तिक जागा वापरण्यासाठी मिळेल.

तसंच त्याला ज्या डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलं जाईल तिथं एक स्वच्छ आणि मोठी सुती चटई, उशी, चादर आणि ब्लँकेट दिलं जाईल. तसंच जर त्याला वैद्यकीय सुविधांची गरज पडली तर लाकडी पलंग आणि त्यावर बिछाना देखील दिला जाईल. याशिवाय त्याच्या खोलीमध्ये स्वच्छ उजेड, हवा तसंच त्याचं खासगी सामान ठेवण्याची जागाही मिळेल.

Mehul Choksi
IPS Anjana krishna News : अंजना कृष्णा अन् अजितदादांमधील संवादातील 'कच्चा' मुद्दा रोहित पवारांनी हेरला; तिथंच गडबड झाल्याचं स्पष्टच सांगितलं...

घोटाळा काय?

दरम्यान, मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून १४ हजार कोटींचं कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता भारतातून पळून गेले आहेत. नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये वास्वव्यास आहे तर चोक्सी बेल्जिअममध्ये आहे. या दोघांना भारतात आर्थिक घोटाळ्यात खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पणाची मागणी भारतानं या दोन्ही देशांकडं वारंवार केली आहे. पण अद्याप या प्रत्यार्पण प्रक्रियेला पूर्णतः यश आलेलं नाही. पण भारत सरकारचे यासाठीचे प्रयत्न अद्याप कायम आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com