
Rajnath Singh on Pakistan : भारतीय लष्करानं 'Operation Sindoor', यशस्वी केल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक करताना, हल्ल्यामागील लष्करानं दाखवलेला आदर्श सांगताना रामायणामधील हनुमानाची आठवण करून देत सूचक इशारा पाकिस्तानला नाव न घेता दिला.
आम्ही त्यांनाच मारले ज्यांनी निर्दोष लोकांना मारले, आम्ही हनुमानाच्या आदर्शांचे पालन केले. जशी हनुमानाने आधी रावणाची अशोक वाटिका जाळली होती. देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन सिंदूर' लॉन्च केले आणि दहशतवाद्यांनी भारत भूमीवर हल्ला केला, त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी 'राईट टू रिस्पॉन्स'चा वापर करत प्रत्युत्तर दिल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशातून भारतीय (India) लष्करानं दहशतवाद्यांना आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या देशाविरोधात एक नवीन इतिहास रचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम. भारतीय सैन्याने मानवता आणि सतर्कता दाखवल्याचे कौतुक देखील राजनाथ सिंह यांनी केले. आम्ही त्यांनाच मारले ज्यांनी निर्दोष लोकांना मारले, असे सांगताना दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद्ध्वस्त करून सडेतोड उत्तर दिले. दहशतवाद्यांनी भारत भूमीवर हल्ला केला, त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी 'राईट टू रिस्पॉन्स'चा वापर करत प्रत्युत्तर दिल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir), लडाख, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान इथं रस्ते, पूल अशा सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. त्यावेळी ते बोलत होते. अशा प्रकल्पांमुळे माणसे जोडली जातात, सुरक्षा यंत्रणा मजबूत होते, तसेच सामाजिक व आर्थिक सुधारणादेखील होतात. वाहतूक, दळणवळण, पर्यटन यांना चालना मिळून आर्थिक वृद्धी होईल व येथील स्थानिकांचे आर्थिक उत्पन्न निश्चितपणे वाढेल, तसेच त्यांचे जीवनमान सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुमारे 1 हजार 900 कोटी रुपयांची ही कामे आहेत. रस्ते, बोगदे, पूल इत्यादी बांधकामांमुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, रुग्ण अशा सर्वांचाच फायदा होईल, जो पैशात मोजता येणार नाही. त्याचे समाधान पैशांपेक्षा मोठे असेल, असे सिंह म्हणाले.
या प्रकल्पांमध्ये काही रस्ते- पूल लहान आहेत. परंतु आकारमानाचा विचार न करता उपयुक्ततेचा विचार केला पाहिजे. ही बांधकामे फक्त एक संरचना नसून नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आहे. 'कनेक्टिंग प्लेसेस कनेक्टिंग पीपल', हेच उद्दिष्ट समोर ठेवून भारताला जोडण्याचे काम आम्ही करत आहोत. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी आपण तयार राहिले पाहिजे, अगदी युद्ध पातळीवर आपण तयार राहिले पाहिजे, अशी अपेक्षाराजनाथ सिंह त्यांनी व्यक्त केली.
'अतिशय वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे असेल मात्र ते चालवण्यासाठी योग्य रस्ताच नसेल तर उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे एखादा मजबूत रणगाडा चालवण्यासाठी, सरावासाठी योग्य जागा नसेल किंवा अत्याधुनिक फायटर प्लेन चालवण्यासाठी योग्य एअरबेस नसेल तर त्याचे काही महत्त्व राहणार नाही. आता आपले रस्ते एवढे गुणवत्ता पूर्ण असावेत की कोणत्याही रस्त्यावर 'फाइटर प्लेन' उतरू शकेल त्या प्लेनला पुन्हा एअर बेस वर जाण्याची गरज उरणार नाही', असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.