Anna Hazare On Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' म्हणजे, भारत स्वतःहून छेडखानी करत नाही, समोरच्यानं केल्यावर..; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare Reacts to Operation Sindoor Indian Army Air Strike in Pakistan : पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर भारतीय लष्कारानं 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एअर स्ट्राइक केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली.
Anna Hazare On Operation Sindoor
Anna Hazare On Operation SindoorSarkarnama
Published on
Updated on

Anna Hazare reaction air strike : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्करानं मध्यरात्री एअर स्ट्राइक करत, पाकिस्तान स्थित नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

भारतीय लष्कराने दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकचं सर्वसामान्यांकडू स्वागत होत असताना, त्यावर प्रतिक्रिया देखील उमटत आहे. लष्करी सेवेतून निवृत्ती झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राइकवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले, "भारतीय लष्कारने पाकिस्तानातील (Pakistan) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं देशभरात कौतुक होत आहे. लष्कराच्या शौर्याचं हे कौतुक शब्दात पकडता येणार नाही, असं आहे. इतकं सुंदर काम लष्करानं केले आहे. लष्काराच्या कारवाईचं अभिनंदन".

Anna Hazare On Operation Sindoor
Operation Sindoor : पाकिस्तानची घाबरगुंडी; आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 48 तासांसाठी बंद, 'LOC'वर गोळीबार सुरूच

'भारत (India) स्वतःहून कोणाची छेडखानी करत नाही. मात्र कोणी दुसऱ्यानं छेडखानी केल्यावर, त्याला सोडायचं नाही, ही कारवाई योग्यच आहे', असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. काही कारण नसतांना आमचे 26 लोक मारले, त्याचा बदला भारताने घेतला. त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही, अशा प्रकारची ही कारवाई लष्कारानं केली आहे. आता कुणाची हिंमत होणार नाही, पुन्हा छेडखानी करण्याची, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले.

Anna Hazare On Operation Sindoor
7000 million Indian notes : भारताकडून पहिल्यांदाच विक्रमी सात हजार मिलियन नोटांची छपाई; दहा रुपयांच्या नोटा न छापण्याचं काय आहे कारण?

1962 च्या भारत-चीन युद्धानंतर, तरुणांना सैन्यात भरती होण्याचे सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अण्णा 1963 मध्ये लष्कराच्या मराठा रेजिमेंटमध्ये चालक म्हणून रुजू झाले होते. अण्णांची पहिली नियुक्ती पंजाबमध्ये झाली. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान अण्णा हजारे खेमकरण सीमेवर तैनात होते.

12 नोव्हेंबर 1965 मध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाने जोरदार हल्ला चढवला होता. त्यावेळी हल्ल्यात चौकीवर तैनात असलेले सर्व सैनिक ठार झाले. या घटनेने अण्णांचे आयुष्य कायमचे बदलले. त्यानंतर त्यांनी आणखी 13 वर्षे सैन्यात सेवा केली. मुंबई आणि काश्मीरमध्येही पोस्टिंग झाली होती. 1975 मध्ये, जम्मूमध्ये तैनात असताना, सैन्यात 15 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी अहिल्यानगरच्या राळेगणसिद्धी गावात राहून सामाजिक कार्य करताना देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू केली. 1992 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. देशात माहिती अधिकार कायद्यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com