MK Stalin election petition : विधानसभेतील पराभव जिव्हारी, निकालाविरोधात स्टॅलिन हायकोर्टात; CM विजय यांना धक्का बसणार?

Kolathur election result, Madras High Court, Stalin vs Babu : कोलाथूरमधील पराभवावर स्टॅलिनांचा न्यायालयीन डाव; मतदान यंत्रातील बिघाड, VVPAT अनियमिततेचा दावा करत पुनर्मोजणी व बाबूंचा विजय रद्द करण्याची मागणी
DMK chief M.K. Stalin has challenged TVK candidate V.S. Babu’s Kolathur election victory, citing alleged EVM and VVPAT discrepancies and seeking a recount.
DMK chief M.K. Stalin has challenged TVK candidate V.S. Babu’s Kolathur election victory, citing alleged EVM and VVPAT discrepancies and seeking a recount.Sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu Politics : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि DMK प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. कोलाथूर या त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाचे उमेदवार व्ही.एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला होता. या मतदारसंघासह टीव्हीकेच्या उमेदवारांनी संपूर्ण राज्यातच डीएमकेला हादरा दिला होता.

बालेकिल्ल्यातील पराभव स्टॅलिन यांच्या टांगलाच जिव्हारी लागला आहे. या निकालाला स्टॅलिन यांनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 'एएनआय'च्या वृत्तानुसार, स्टॅलिन यांनी आमदार व्ही. एस. बाबू यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मद्रास हायकोर्टात दाखल केली आहे.

स्टॅलिन यांनी याचिकेमध्ये मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचा तसेच VVPAT मशीनमधील अनियमिततेचे आरोप केले आहेत. त्यामुळे कोलाथूर मतदारसंघातील मतांची पुनर्मोजणी करण्याचे आदेश देण्याची मागणी स्टॅलिन यांची याचिकेतून केली आहे. त्याचप्रमाणे बाबू यांचा विजय रद्द करून आपल्याला विजयी घोषित करावे, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

DMK chief M.K. Stalin has challenged TVK candidate V.S. Babu’s Kolathur election victory, citing alleged EVM and VVPAT discrepancies and seeking a recount.
निलंबित महिला IAS अधिकाऱ्याने राज्य सरकारला झुकवले, केंद्राला करावे लागले नवे नियम

निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास साडे तीन महिन्यांनंतर स्टॅलिन यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांचा सुमारे ८ हजार मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर टीव्हीकेने आपल्या पहिल्याच निवडणुकीत २३४ पैकी १०७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याची किमया साधली होती.

DMK chief M.K. Stalin has challenged TVK candidate V.S. Babu’s Kolathur election victory, citing alleged EVM and VVPAT discrepancies and seeking a recount.
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

निकालानंतर डीएमके आघाडीत असलेल्या काँग्रेससह इतर मित्रपक्षांनी विजय यांच्यासोबत जात सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यात डीएमके पक्ष एकाकी पडल्याचे चित्र आहे. यापार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी केलेल्या निवडणूक याचिकेला महत्व प्राप्त झाले आहे. आता याबाबत कोर्टात त्यांच्याकडून कोणते मुद्दे मांडले जाणार, टीव्हीकेकडून त्याला कसे प्रत्युत्तर दिले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com