Modi Government: वाढत्या अतिरेकी कारवाया, मोदी सरकारनं उचललं कठोर पाऊल; 'या' दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं

Central Government in Action Mode : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सक्रीय झाले आहेत. तिथे दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत असून भारतीय लष्करांमध्ये सातत्याने चकमकी उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
Amit Shah.jpg
Amit Shah.jpgSarkarnama
Published on
Updated on

मोदी सरकारने आपल्या पहिल्या आणि दुसर्‍या टर्ममध्ये दहशतवादी संघटनांवर आपला वचक बसवला होता. त्यामुळे एकही अतिरेकी हल्ला किंवा घुसखोरीची घटना उघडकीस आली नव्हती. आणि पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्टाइकनंतर मोदींनी ये नया भारत है घुसकर मारेगा अशी टॅगलाईन चालवत 2019 मध्ये दणदणीत विजय मिळवला होता.

पण आता केंद्रात मोदी सरकार (Modi Government) तिसर्यांदा सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसांपासून दहशतवादी संघटना पुन्हा एकदा कार्यरत झाल्या असतानाच सीमारेषेसह जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत.त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने कठोर पावले उचलतानाच मोठी कारवाई केली आहे.अमित शाह (Amit Shah) यांच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाचे डायरेक्टर जनरल नितिन अग्रवाल यांच्यासह बीएसएफचे स्पेशल डीजी वाय.बी.रुराानिया यांना पदावरुन हटवलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सक्रीय झाले आहेत. तिथे दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत असून भारतीय लष्करांमध्ये सातत्याने चकमकी उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

Amit Shah.jpg
Gyandev Ahuja : गोहत्या झाली म्हणून वायनाडमध्ये भूस्खलन, भाजप नेत्याचा अजब दावा

मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच दहशतवादी कारवायांवर ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते.त्याच उद्देशाने काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाची देशाच्या सीमा सुरक्षेप्रश्नी आणि वाढत्या अतिरेकी कारवायांच्या धर्तीवर महत्त्वाची बैठक बोलावली होती.त्या बैठकीनंतर काहीतरी मोठे घडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

केंद्र सरकारने बीएसएफचे स्पेशल डीजी वाय.बी.रुराानिया यांना परत ओडिशा केडर तर सीमा सुरक्षा दलाचे डायरेक्टर जनरल नितीन अग्रवाल यांना त्यांच्या केडर केरळमध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएफ आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्वोच्च अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली ही कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात अनेक अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.

Amit Shah.jpg
Manoj Jarange Patil : उमेदवार उभे करायचे की पाडायचे ? निर्णयाआधीच सत्ताधारी आमदार जरांगे यांच्या भेटीला..

मागील काही वर्षांमधील अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचेही बोलले जात आहे. अतिरेक्यांची घुसखोरी वाढली होती. त्यावर नियंत्रण आणण्यात दोन्ही अधिकाऱ्यांना अपयश आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या सुरूवातीलाच दहशतवाद्यांनी जणू धुडगुस घातला आहे.

मागील महिनाभरात जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे सरकारसह लष्कराची चिंता वाढली आहे.

Amit Shah.jpg
Jayant Patil News : 'मी त्यांना कधीही भेटलो नाही,माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही'; सचिन वाझे प्रकरणात जयंत पाटलांनी झटकले हात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com