

Delhi News : मोदी सरकारने दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करून मोठी भेट दिली आहे. आता डीए आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचा तब्बल ५२ लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.
मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कर्मचार्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. महागाई भत्ता वाढीचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 पासून उपलब्ध होणार आहे.
तसेच महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. विशेष म्हणजे देशात 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत. त्यांना ज्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. (Dearness Allowance)
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या(Central Employee) पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा डीएमध्ये सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना 1 जानेवारी व 1 जुलैपासून दिला जातो. उल्लेखनीय आहे की देशात सुमारे 52 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा होणार आहे.
या वेळीही केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ मिळण्याची अपेक्षा होती. या अगोदर केंद्र सरकारने 24 मार्च 2023 ला महागाई भत्ता हा 38 टक्के डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के केला होता. तेव्हा सरकारने 1 जानेवारी 2023 पासून या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणार असल्याचेही जाहीर केले होते.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीतील विजयासाठी भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्षात मोदी सरकारने दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ केली आहे. त्यामुळे एकाच वर्षात आठ टक्के वाढ मिळाली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.