Mohan Bhagwat: दिल्लीत जेनझींचा ठिय्या!मोहन भागवतांची मोदी सरकारला केली महत्वाची सूचना? म्हणाले, तरुणांशी चर्चा...

Mohan Bhagwat: दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जेनझींनी ठिय्या मांडला असून त्यांच्या मागण्यांवर स्पष्ट भूमिका घ्यायला सरकार अद्याप तयार असल्याचं दिसत नाही.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwat
Published on
Updated on

Mohan Bhagwat: दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जेनझींनी ठिय्या मांडला असून त्यांच्या मागण्यांवर स्पष्ट भूमिका घ्यायला सरकार अद्याप तयार असल्याचं दिसत नाही. तसंच भाजपचा थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि युवकांना संस्कृती अन् देशप्रेमाचे धडे देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील या जेनझींच्या आंदोलनावर अद्याप भाष्य केलेलं नाही. दरम्यान, संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आजच्या तरुणांच्या मानसिकतेवर भाष्य केलं.

थेट सीजेपीच्या आंदोलनावर न बोलता त्यांनी सूचकपणे सरकारला काही गोष्टी सुनावल्या आहेत. भागवत म्हणाले, "आधी आपली जगण्याची जी शैली होती ती आता आपल्याला बदलावी लागेल. आधी आज्ञापालनाचा काळ होता, जेव्हा आम्ही लहान होतो आई-वडिलांनी काही म्हटलं तर त्यावर प्रतिक्रिया दिली जात नव्हती. चूप म्हणजे चूप, त्यांची पालकांच्या बोलण्यावर श्रद्धा पण होती. त्यामुळं त्यावर कुठलीही प्रतिक्रिया येत नव्हती. त्यांना माहिती होतं की यांनी जग पाहिलं आहे त्यामुळं त्यांच्या अनुभवनानं सर्वकाही ठीक होईल.

पण आता असं राहिलेलं नाही, नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्क सांगावा लागतो. ज्या सर्व भौतिक साधनांद्वारे प्रचाराचा मारा त्यांच्यावर होतो, त्यातून जी भूलभुलैय्या तयार होते, त्यातून त्यांना बाहेर काढावं लागतं. म्हणजेच आज त्यांना अधिक आपलेपण देणं गरजेचं आहे. त्यांना वेळ देणं गरजेचं आहे, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे.

Mohan Bhagwat
Patallok Project: CM फडणवीसांनी पुण्यासाठी घोषित केलेल्या 'प्रोजेक्ट'ला धक्का : व्यावहारिक अडचणींमुळे कुदळ पडण्यापूर्वीच गुंडाळावा लागणार?

त्यांना आता 'डिक्टेशन' (सांगेल तसं वागणं) नाही तर त्यांच्यासोबत 'डिस्कशन' (चर्चा करणं) करणं गरजेचं आहे. तसंच त्यांना 'ऑर्डर' (आदेश) द्यायची नाही तर कॉन्शन्सेस (जाणीव करुन) द्यायची गरज आहे. आज कुटुंबात चर्चा बंद झाली आहे, पती-पती ऑफिसवरुन येतात त्याचवेळी मुलंही शाळेतून आल्यामुळं ते खाहीतरी खातात आणि त्यानंतर प्रत्येकजण आपला मोबाईल हातात घेतो आणि स्क्रोल करत बसतो. बाहेरुन भेटायसाठी आलेल्यांचं देखील ते ऐकत नाहीत, हाच तुमचा अनुभव आहे ना? हे बदलावं लागेल! त्यानंतर वेळ मिळेल, वेळ मिळालं तर चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर मुलं खुलून काहीतरी बोलतील. आपलं मूल कितीही दूर जाऊ द्या त्याला जीवनात हा अनुभव नक्कीच येतो की, आपलं स्वतःचं काय आहे याचं जगात काय महत्व आहे"

Mohan Bhagwat
Narendra Modi Record : 'मोदी मॅजिक'! PM मोदींच्या सेल्फी व्हिडिओचा 'डिजिटल धमाका'; 24 तासांत 30 कोटी व्ह्यूजसह रचला नवा जागतिक विक्रम!

दरम्यान, २० जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चेवेळी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्नही सरकारनं केला. त्यानंतर सीजेपीच्या आंदोलकांशी २३ दिवसांनंतर सरकारनं चर्चेला सुरुवात केली. आत्तापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत, पण सरकारनं आंदोलकांची प्रमुख मागणी अद्याप मान्य केलेली नाही. अखिल भारतीय स्तरावर घेतली जाणारी NEET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी इतर संबंधित घटकांसोबतच शिक्षण मंत्र्यांवरही जबाबदारी निश्चित करुन त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. पण अद्याप सरकार याबाबत सकारात्मक असल्याचं दिसत नाही आणि आंदोलकही हा राजीनामा झाल्याशिवाय माघार घेणार नसल्यावर ठाम आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com