Burning of Notes: सरकारी इंजिनिअरच्या घरात पैशांचं घबाड! पोलिसांची धाड पडताच केलं नाटक; रात्रभर नोटा जाळून थकला अखेर...

Burning of Notes: आजवर आपण नेते मंडळी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये भ्रष्टाचारातून कमावलेल्या घबाडाच्या बातम्या ऐकल्या आहेत. त्यात आता आणखी एका सरकारी इंजिनिअरची भर पडली आहे.
Burning Money
Burning Money
Published on
Updated on

Burning of Notes: आजवर आपण नेते मंडळी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये भ्रष्टाचारातून कमावलेल्या घबाडाच्या बातम्या ऐकल्या आहेत. त्यात आता आणखी एका सरकारी इंजिनिअरची भर पडली आहे. या इंजिनिअरच्या घरात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली यामध्ये त्यांना केवळ ३९ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. पण तत्पूर्वी या इंजिनिअरनं घरात रात्रभर तीन कोटी रुपयांच्या नोटा चक्क जाळून टाकल्या. रात्रभर तो हा उद्योग करत बसला होता.

Burning Money
India Post : ट्रम्प यांच्या टॅऱिफ बॉम्बनंतर भारताचा मोठा निर्णय! अमेरिकेला जाणारी टपाल सेवा केली स्थगित

विनोद राय असं या सरकारी इंजिनिअरचं नाव असून तो बिहारच्या ग्रामीण कार्य विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी विनोद आणि त्याच्या पत्नीविरोधात नोटा जाळून नष्ट करणे आणि सरकारी पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. तसंच इंजिनिअरच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burning Money
Bihar Politics : नितीश कुमारांच्या टोपीच्या राजकारणाची चर्चा केंद्रस्थानी! बिहारमध्ये मुस्लिम फॅक्टर किती महत्वाचा?

माध्यमांतील वृत्तांनुसार, इंजिनिअर विनोद राय गेल्या गुरुवारच्या रात्री सीतामढीहून नोटांच्या बॅगा घेऊन पटनाकडं निघाला होता. याची माहिती स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्याच रात्री पोलिसांची टीम या इंजिनिअरच्या घरी पोहोचली. पण तत्पर्वीच या इंजिनिअरनं पटना इथल्या आपल्या दुसऱ्या घरी सर्व पैसा पोहोचवला होता. जेव्हा गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा इंजिनिअरची पत्नीनं त्या पोलिसांपुढे एक भिंत म्हणून खाली उभी राहिली. तिनं पोलिसांना सांगितलं की, ती घरात एकटीच आहे. त्यामुळं नाईलाजानं पोलिसांच्या टीमला छापेमारीसाठी सकाळपर्यंत वाट पाहावी लागली.

Burning Money
PMC Ward Restructure: भाजपचा सिक्रेट गेम! अजित पवारांच्या शिलेदारांचे प्रभाग वेडेवाकडे तोडले; आता नेते थेट संघर्षाच्या तयारीत

तर दुसरीकडं वरच्या खोलीमध्ये इंजिनिअर संपूर्ण रात्रभर नोटा जाळत बसला होता. नोटा जाळून जाळून तो अक्षरशः थकला तरीही त्याच्याकडं ३९.५० लाख रुपये शिल्लक राहिलेच. जेव्हा शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या पथकानं त्याच्या घरी छापेमारी केली तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीतून ही रोख रक्कम जप्त केली. तसंच या टीमला या घरातून तब्बल १२ लाख रुपयांचे अर्धवट जळालेल्या नोटा आढळून आल्या. तसंच बाथरुमच्या पाईपमधून मोठ्या प्रमाणावर जळालेल्या नोटांचा लगदा बाहेर पडताना आढळला. यावरुन या इंजिनिअरनं रात्रभर २ ते ३ कोटी रुपयांची रोख रक्कम जाळली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com