

Monsoon Arrival: यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याचा अंदाज इतकंच नव्हे तर दुष्काळाची स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं आधीच वर्तवलेला आहे. महासागरांमध्ये अल निनोचा प्रभावामुळं यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ही शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब असतानाच भारतीय हवामान विभागानं खूशखबर दिली आहे. मॉन्सून भारतात कधी दाखल होणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं पावसाचं आगमन ही भारतीयासांठी आनंदाची बाब ठरणार आहे.
हवामान खात्यानं मॉन्सूनबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून हा अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल, त्यानंतर त्याची पुढे वाटचाल होत तो पहिल्यांदा केरळ आणि त्यानंतर हळूहळू पुढे सरकत महाराष्ट्र आणि संपर्ण देशभरात व्यापून जाईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. दुष्काळाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदा वेळेवर मॉन्सून दाखल होणार असल्यानं ही खूशखबरच ठरली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ नोंदवली गेली आहे. त्यानुसार, काल देशभरात सरासरी सर्वोच्च तापमानाची नोंद ही ४२ डिग्री सेल्सिअस इतकी झाली, तर राजस्थानच्या बामनेरमध्ये कालच सर्वोच तापमान ४७.३ डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. तर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात ४२ डिग्रीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. त्यानंतर आता पुढील तीन दिवस आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हे तापमान किमान २ ते ३ अंश डिग्री सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.