Donald Trump : सीजफायरच्या वक्तव्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न, 'आधी म्हणाले, माझ्यामुळे अन् आता मी फक्त...'

Donald Trump on India-Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली. तसेच याबाबत त्यांनी 10 मे रोजी सोशल मीडियावर पोस्टकरत दावा केला होता.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. तसेच 10 मे रोजी सोशल मीडियावर पोस्टकरत आपण युद्धबंदी केल्याचा दावा केला होता. पण आता आपल्याच दाव्यावरून ट्रम्प यांनी यू-टर्न घेत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, युद्धबंदी माझ्यामुळेच झाली असे मी म्हणणार नाही. पण उभय देशांतील तणाव कमी करण्यात माझी मदत नक्की झाली असल्याचे म्हटलं आहे. यामुळे देशात सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी मध्यस्थी करताना, 10 मे रोजी दोन्ही देशांमधील मध्यस्थीची घोषणा केली होती. तसेच त्यांनी, 'अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आणि दीर्घ वाटाघाटीनंतर भारत आणि पाकिस्तान पूर्णपणे आणि तात्काळ युद्धबंदी करत आहे. या युद्धबंदी दोघांची सहमती झाली आहे. याची माहिती देताना मला आनंद होत असून दोन्ही देशांनी घेतलेल्या योग्य निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन.

पण आता ट्रम्प यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली असून त्यांनी घुमजाव केला आहे. त्यांनी, दोन्ही देशात तणाव वाढत चालला होता. जे अख्या जगाने पाहिले. तसेच दोन्ही देशांनी वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. यामुळे आम्ही दोन्ही देशांशी व्यापाराबद्दल बोललो. युद्धाऐवजी आपण व्यापार करूया, असा प्रस्ताव दिला. ज्यावर भारत आणि पाकिस्तान दोघांनाही सहमती दर्शवली. हा मार्ग दोन्ही देशांनी निवडला.

Donald Trump
Donald Trump Tariff: आले ट्रम्प यांच्या मना, तिथे कोणाचे काही चालेना! अमेरिकेचा दणका, मात्र संधीही...

'मी असे म्हणत नाही की, हे मी केलं. परंतु हे निश्चित आहे की गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये जे घडले ते मी सोडवण्यास मदत केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी भयानक हल्ले होऊ शकले असते. पण आम्ही सर्व काही थांबवले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1 हजार वर्षांपासून संघर्ष सुरू असून मला वाटते की ही समस्या मी सोडवू शकतो. मी कोणतीही समस्या सोडवू शकतो. त्या प्रमाणे मी ही समस्या संपवली. यासाठी या दोन्ही देशांना सोबत येण्याचे आवाहन केलं. म्हणालो, चला एकसोबत चलू. पुन्हा एकत्र येऊया (भारत-पाकिस्तान). आणखी किती वर्ष लढत राहणार आहात? हजार की आणखी कितीतरी वर्षे. मी या मध्यस्थीशी निश्चित नव्हतो. पण यश मिळाले.

Donald Trump
Donald Trump : ट्रम्प यांना अडचणीत टाकणारा प्रश्न अन् जॉर्जिया मेलोनी खदखदून हसल्या! Video होतोय व्हायरल...

भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

तथापि, ट्रम्प यांच्या या दाव्याचे खंडन भारताने याआधीच केलं होतं. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सहा मुद्दयाचे निवेदन जाहीर केले होते. या निवेदनातून अमेरिकेने शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला होता. तसेच शस्त्रविरामासाठी व्यापार कारणीभूत नसल्याचेही स्पष्टीकरण दिले होते. तर युद्धबंदीची घोषणा दोन्ही देशांमधील डीजीएमओंनी केलेल्या चर्चेनंतर केल्याचेही भारताने ठाम सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com