Siddaramaiah : सिध्दरामय्या यांचा पत्नीबाबत मोठा दावा; म्हणाले, तो निर्णय आश्चर्यचकित करणारा!

MUDA Scam Case ED Action : सिध्दरामय्या यांच्यावर ईडीने सोमवारी रात्री गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Siddaramaiah and Wife Parvati
Siddaramaiah and Wife ParvatiSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) भूखंड घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कथित घोटाळ्यात आता ईडीची एन्ट्री झाली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने वादग्रस्त 14 भूखंड परत MUDA ला परत केल्याची माहिती खुद्द सिध्दरामय्या यांनीच दिली आहे.

पत्नी पार्वती यांनी परस्पर हा निर्णय घेतल्याचा मोठा दावा सिध्दरामय्या यांनी केला आहे. हा निर्णय आपल्यासाठी आश्चर्यचकित करणारा होता, असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, पत्नीने 14 भूखंड परत करण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटले. राजकीय षडयंत्रामुळे माझ्या पत्नीला खूप भोगावे लागल्याचेही त्यांनी सांगितले. पण जमीन परत करण्याच्या निर्णयाचा मी आदर करतो, असे ते म्हणाले.

Siddaramaiah and Wife Parvati
ED action against Siddaramaiah : 'ED'ने सिद्धरामय्यांभोवती आवळला फास, तर पत्नीने 'MUDA'ला पत्र लिहून घेतला मोठा निर्णय!

सिध्दरामय्या यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, माझी पत्नी, पार्वतीने MUDA कडून कोणत्याही मोबदल्याशिवाय घेतलेली म्हैसूरमधील जमीन परत केली आहे. राजकीय हेतून प्रेरित झालेले आरोप विरोधकांनी माझ्यावर केल्याचे लोकांना माहिती आहे. या षडयंत्रामध्ये माझ्या कुटुंबालाही गोवण्यात आले.

कुणासमोरही न झुकता या अन्यायाविरोधात लढण्याची माझी ठाम भूमिका असल्याचे सांगत सिध्दरामय्या यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. माझी पत्नी जवळपास चार दशके राजकारणापासून दूर राहिली. तिने स्वत:ला कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले. पण माझ्याविरोधात षडयंत्रामुळे तिला मानसिक त्रास झाल्याची नाराजी सिध्दरामय्या यांनी व्यक्त केली.

Siddaramaiah and Wife Parvati
Gurmeet Ram Rahim Singh : गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार ; निवडणूक आयोगाचा 'पॅरोल'वर निर्णय!

दरम्यान, सोमवारी रात्री सिध्दरामय्या यांच्यावर ईडीकडून मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नी पार्वती यांनी MUDA आयुक्तांना पत्र लिहून आपण जमीन परत करत असल्याचे म्हटले होते. कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनीही 27 सप्टेंबरला सिध्दरामय्या यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी मंगळवारपासून सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com