ED action against Siddaramaiah : 'ED'ने सिद्धरामय्यांभोवती आवळला फास, तर पत्नीने 'MUDA'ला पत्र लिहून घेतला मोठा निर्णय!

Siddaramaiah wife Parvati sent letter to MUDA : 'मला या प्रकरणी माझ्या पतीचे मत काय माहीत नाही आणि मला याचीही चिंता नाही, की माझा मुलगा किंवा कुटुंबातील अन्य सदस्य काय विचार करतील.', असंही म्हणाल्या आहेत.
ED action against Siddaramaiah
ED action against SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

CM Siddaramaiah and MUDA Scam Case : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात तपास यंत्रणा 'ED'ने 'MUDA' घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांनी 'MUDA'ला एक पत्र लिहून वाटप केलेले १४ भूखंड परत करण्याचे म्हटले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या(Siddaramaiah) यांची पत्नी पार्वती यांनी 'MUDA'ला पाठवलेल्या पत्र म्हटले की, 'मी म्हैसूरमधील मुडा कटाशी निगडीत आरोपांमुळे अतिशय व्यथित आहे. माझे बंधू बाबू यांना कौटुंबिक वारसा म्हणून मिळालेल्या भूखंडामुळे एवढा गोंधळ निर्माण होईल आणि माझ्या पतीवर चुकीचे आरोप होतील, अशी मी कधीही कल्पना केली नव्हती.'

ED action against Siddaramaiah
Siddaramaiah : सिध्दरामय्यांनी CBI ला हद्दपार करताच ED सक्रीय; कर्नाटकात मोठ्या घडामोडीचे संकेत

तसेच 'माझ्यासाठी कोणतेही घर, प्लॉट किंवा संपत्ती माझ्या पतीचा आदर, सन्मान आणि मानसिक शांतीपेक्षा जास्त महत्त्वाची नाही. एवढी वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, मी कधीही स्वत:साठी किंवा माझ्या परिवारासाठी वैयक्तिक लाभाची अपेक्षा ठेवली नाही. माझ्यासाठी या चर्चांना काही अर्थ नाही. त्यामुळे मी या वादाचा केंद्रबिंदू बनलेले 14 MUDA भूखंड परत करण्याचा निर्णय घेतला आहे.'

'मला या प्रकरणी माझ्या पतीचे मत काय माहीत नाही आणि मला याचीही चिंता नाही, की माझा मुलगा किंवा कुटुंबातील अन्य सदस्य काय विचार करतील. मी या प्रकरणी कोणाशीही चर्चा केली नाही. हा निर्णय विचारपूर्वक आणि माझ्या अंतरमनाचा आवाज ऐकल्यानंतर घेतला आहे.' असं पार्वती यांनी म्हटलं आहे.

ED action against Siddaramaiah
Land Scam : काँग्रेसच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला जमीन घोटाळा भोवणार; सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह 10 जणांवर गुन्हा

याशिवाय त्यांनी हे देखील म्हटले की, 'काहीजण विचारू शकतात की, या टप्प्यावर असा निर्णय का घेतला?, ज्या दिवशी आरोप झाले त्याच दिवशी हा निर्णय घेता आला असता. खरंतर MUDAभूखंड वाटप प्रकरणातील आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरीत होते. त्यामुळे काही हितचिंतकांनी सल्ला दिला की आपल्याला या अन्यायाविरोधात लढलं पाहीजे आणि त्यांच्या कटाचा बळी बनलं नाही पाहीजे. त्यामुळेच मी सुरुवातीसच भूखंड परत करण्यापासून मागे हटले. परंतु आता माझा निर्णय स्पष्ट आहे. मी हे भूखंड परत करण्यासोबतच MUDAच्या सर्व आऱोपांच्या चौकशीचीही मागणी करते आहे.' असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी पत्रात म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com