"राष्ट्रवादीची भूमिका कायमच भाजपच्या बाजूने" : पटोलेंनी हायकमांडकडे केली पवारांची तक्रार

Congress | BJP | NCP : राष्ट्रवादी-भाजपचे संबंध उघडे पाडणारचं!
Nana Patole will meet Sharad Pawar today
Nana Patole will meet Sharad Pawar todaySarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राज्यातील भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा वाद आता टोकाला गेला आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीत अध्यक्षपदी काँग्रेसचा (Congress) तर गोंदियामध्ये भाजपचा (BJP) विजय झाला आहेत. मात्र यात भंडाऱ्यामध्ये भाजपने काँग्रेसला मदत केली तर गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपला मदत केली. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसत भाजपला साथ दिली असल्याचा आरोप केला होता. सोबतच याबाबतची तक्रार हायकमांडकडे करणार असल्याचेही पटोले म्हणाले होते.

त्यानंतर आता हा वाद नाना पटोले यांनी हायकमांडच्या कानावर घातला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातून नाना पटोलेंसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेस हायकमांड राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे.

Nana Patole will meet Sharad Pawar today
केतकी चितळेवर पारनेरमध्ये गुन्हा दाखल : 'शिवप्रहार'चे संजीव भोर आक्रमक

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. पण, राष्ट्रवादीची भूमिका नेहमी भाजपच्या बाजूने असते. राष्ट्रवादीकडून नेहमी सोनिया गांधींचा अपमान केला जातो. ज्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाली त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम राष्ट्रवादी कडून होत आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. याबाबत काँग्रेस हायकमांड लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं. ते साम टीव्हीसोबत बोलत होते.

Nana Patole will meet Sharad Pawar today
केतकी चितळेही सदावर्तेंच्या वाटेवर : साताऱ्यात बारावा गुन्हा दाखल

काय म्हणाले होते नाना पटोले?

बेईमानी आमच्या रक्तात नाही मात्र भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला अशी जहरी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःला विकास पुरुष म्हणून मिरविणाऱ्या लोकांनी जिल्ह्यातील राजकारण गलिच्छ करुन टाकले आहे, असाही आरोप त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता.

गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची (BJP) साथ दिली. तर भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली असे आरोप करत पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. याशिवाय पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकार केवळ भंडारा-गोंदियात ही नाही तर मालेगांव आणि भिवंडीतही केला असल्याच्या आरोप केला होता.

Nana Patole will meet Sharad Pawar today
पटेल-पटोले वादाचा भाजपला फायदा; काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या पाठीत खुपसला खंजीर

यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार पटलवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ट्वीट करत पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. चव्हाण आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''स्वतः पाठीत सुरा खुपसून चाकू दुसऱ्याच्या हातात दिल्याने गुन्हेगाराचा गुन्हा लपत नसतो. नाना पटोलेजी कोणी कोणाच्या पाठीत सुरा खुपसला हे महाराष्ट्र्र बघतोय.'' अशा शब्दांत चव्हाण यांनी पटोले यांना सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com