Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची विचारपूस करत दिला विश्रांतीचा सल्ला, सुप्रिया सुळेंबाबत काय म्हणाले?

Sharad Pawar Health Update:नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विठ्ठल मणियार यांनी महत्त्वाची माहिती दिली.
Sharad Pawar Reacts After PM Narendra Modi’s Appeal
Sharad Pawar Reacts After PM Narendra Modi’s AppealSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ नोव्हेंबर) सकाळी त्यांना फोन केला. यावेळी मोदी यांनी पवार यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच, तब्येतीची काळजी घेण्याचा आणि सध्या पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला.

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. या संभाषणादरम्यान त्यांनी, आपण आपल्या तब्येतीची योग्य काळजी घ्या, कोणतीही चिंता करू नका आणि पूर्ण विश्रांती घ्या, असे सांगितले. पंतप्रधानांनी व्यक्त केलेली ही आस्था आणि काळजी या संवादातून दिसून आली.

या फोननंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आवर्जून फोन केल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार व्यक्त केले. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राज्यासह राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळातून सातत्याने विचारपूस केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही फोन करून त्यांची तब्येत जाणून घेतली. या संवादात त्यांनी पवार यांना विश्रांतीला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला.

Sharad Pawar Reacts After PM Narendra Modi’s Appeal
Pratibha Dhanorkar: ‘श्यामभाऊ माझ्या मोठ्या भावासारखे’; व्हायरल व्हिडीओवर प्रतिभा धानोरकरांनी सांगितला बसमधील नेमका प्रकार

प्रकृती खाल्यावल्याने पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी आज माध्यमांना याबाबतची माहिती दिली.

Sharad Pawar Reacts After PM Narendra Modi’s Appeal
Maharashtra Congress: महिला काँग्रेसमध्ये खांदेपालट; नागपूरच्या सुनीता गावंडेंकडे महाराष्ट्राची धुरा, आणखी दोन राज्यांत नवे चेहरे

"आपण आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या, कशाचीही चिंता करू नका. सुप्रिया सुळे आता उत्तम प्रकारे तयार आहेत, आम्ही सर्व मिळून देश सांभाळू," असा सल्ला मोदींनी पवारांना दिल्याचं मणियार यांनी सांगितलं.

शरद पवारांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आणि उत्तम आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील निवासस्थानी ते विश्रांती घेणार आहेत, असंही मणियार यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.