
Modi-Trump Phone Call: फ्रँकफर्टर अल्गेमाईन या जर्मनीच्या वर्तमानपत्रानं केलेल्या एका दाव्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका-भारतामधील संबंधांमध्ये हालचाल वाढली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केले पण मोदींनी त्यांचे फोन उचलले नाहीत, असा दावा या वर्तमानपत्रानं केला होता. भारत-अमेरिकेतील व्यापारासंबंधीचा वाद वाढत असताना हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. पण आता यावर उत्तर देताना एका ज्येष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यानं म्हटलं की, पंतप्रधान मोदी हे फोनवरुन इतर देशाच्या प्रमुखांशी डील करत नाहीत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यानं म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यशैली अशी नाही की ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील जटील मुद्द्यांवर फोनवरुन डील करतील. तर दुसरीकडं सुत्रांनी असंही म्हटलं आहे की, मोदींनी ट्रम्प यांच्या कॉल्सला उत्तर दिलं नाही कारण, त्यांनी या शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला की ट्रम्प हे द्विपक्षीय चर्चेला चुकीच्या पद्धतीनं मांडू शकतात. यापूर्वी देखील भारतानं ट्रम्प यांच्यावर आरोप लावला होता की, त्यांनी भारत-पाकिस्तान तणावादरम्यान झालेल्या चर्चा या त्यांनी जगासमोर तोडून-मोडून सादर केल्या होत्या.
दरम्यान, अमेरिकेन अधिकाऱ्यांनी अद्याप हे स्पष्ट केलेलं नाही की, ट्रम्प यांच्याकडून मोदींना प्रत्यक्षात कॉल करण्यात आला होता की नाही. पण ट्रम्प यांनी गेल्या चार महिन्यात वारंवार हा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान संभाव्य अणुय़ुद्ध रोखलं तसंच या काळात प्रत्येकवेळी त्यांनी वेळा आणि विमानांची संख्या चुकीची सांगितली. वॉशिंग्टनच्या विश्लेषकांनी हे काहीतरी वाढवून सांगितल्याचा दावा केला होता. तसंच ट्रम्प हे स्वतःला शांततेचे निर्माते असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं.
तसंच भारत आणि अमेरिकेमध्ये तणाव आणखी त्यावेळी वाढला जेव्हा मोदींनी कॅनडात झालेल्या जी-२० शिखर संमेलनानंतर व्हाईट हाऊसला येण्यासाठी ट्रम्प यांचा अंतिम क्षणी पाठवलेलं निमंत्रण फेटाळलं होतं. ट्रम्प यांनी या काळात पाकिस्तानचे सैन्य प्रमुख असीम मुनीर यांना निमंत्रित केलं होतं. त्यांनी याला भारत-पाकिस्तान शांतता चर्चेच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचं म्हटलं होतं. पण केंद्र सरकारनं याची कठोर शब्दांत टीका केली होती. तसंच दहशतवादाचा शिकार बनलेला भारत आणि दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान या दोघांना एकाच स्तरावर मोजणं हे खूपच आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं.
माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटलं होतं की, नवी दिल्लीत अमेरिकेविरोधात अत्यंत नाराजी आहे. भारताला वाटतं की, त्याला वारंवार व्यापारी टॅरिफ आणि प्रतिबंधांची धमकी दिली जात आहे. तर रशिया आणि चीनला अशा प्रकारच्या सक्तीचा सामना करावा लागलेला नाही. भारताचं म्हणणं आहे की, त्यांना राजनैतिक सहकाऱ्याच्या ऐवजी व्यावसायिक दबावाच्या हत्यारांप्रमाणं पाहिलं जात आहे. त्याचमुळं आता मोदी सरकारनं संवेदनशील प्रकरणांमध्ये ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपापासून दूर राहत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.