Narendra Modi News : ...तर मोदीजी 'अबकी बार 400 पार'चं स्वप्नं अधुरं राहील; भाजपच्या बड्या नेत्याचं पंतप्रधानांना पत्र!

Lok Sabha Election 2024 : पक्षाकडून असेच प्रकार सुरू राहिले तर ४०० पारचा नारा पूर्ण होणार नाही, असे पत्रातून म्हटले आहे.
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama

Kanpur News : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदार प्रक्रिया ही पार पडली आहे. भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते देशभर प्रचार सभा घेत आहेत. अशा राजकीय माहाेलात उत्तर प्रदेशमधून भाजपच्या गोटातून वेगळी माहिती येत आहे. कानपूर या लोकसभेच्या जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, या जागेवर भाजपने दिलेल्या उमेदवाराबाबत स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. भाजपने कानपूरच्या जागेवर रमेश अवस्थी हा नवा चेहरा दिला आहे. (Latest Marathi News)

अवस्थी यांच्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे नाव भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी नवे आहे. आता त्यांना तिकीट दिल्याबद्दल त्यांच्यावर सवाल उपस्थित होत आहेत. यासंदर्भात कानपूर भाजप माजी उपाध्यक्ष, वीएचपीचे वरिष्ठ प्रवक्ते तसेच बजरंग दलाचे माजी संयोजक, ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते प्रकाश शर्मा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून कानपूरचे उमेदवार अवस्थींच्या निवडीबाबत सवाल विचारले आहेत. तसेच '400 पार' संकल्प साध्य करणे मुश्कील असल्याचे त्यांनी पत्रातून मोदींना म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi News
Hemant Godse News: उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदारांचा प्रचार सुरू; नाशिकवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा दावा

प्रकाश शर्मा कोण?

कानपूरच राजकीय-सामाजिक परिघात प्रकाश शर्मा यांच्या नावाचं वलंय आहे. शर्मा यांनी भाजप, विहिंप, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ पातळीवर काम केले आहे. स्थानिक, कानपूर शहर आणि राज्याच्या राकारणातही त्यांचा सहभाग असतो. मात्र, आपल्याच विचारांच्या पक्षाबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. (Lok Sabha Election)

पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) पाठवलेलं हे पत्र आता व्हायरल झालं आहे. कानपूर ही भूमी क्रांतिकारकांची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याच भूमीत जनसंघ आणि भारतीय जनता पक्षासाठी सुपीक 'राजकीय मैदान' तयार करण्यात आलं. याच भूमीत असा उमेदवार देण्यात आला ज्याची कसलीही ओळख नाही. अवस्थी यांनी भाजपचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी काय भरीव योगदान दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Narendra Modi News
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

400 पारचा नारा -

अवस्थींच्या उमेदवारीमुळे पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. अवस्थींमुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. पक्षाकडून असेच प्रकार सुरू राहिले तर ४०० पारचा नारा पूर्ण होणार नाही, असे पत्रातून म्हटले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com