Narendra Modi Speech : सामान्य लोकांच्या आयुष्यात सरकारी ढवळाढवळ असू नये; मोदींची भावना!

Narendra Modi Speech : लोकांच्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर सरकारने हस्तक्षेप का करावं?
Narendra Modi Speech
Narendra Modi SpeechSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. संसदेत आज श्री राम मंदिर उभारणीसाठी आभार प्रस्ताव मांडला गेला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांनी लोकसभेत भाष्य केलं आहे. "17 व्या लोकसभेला देश आशीर्वाद देत राहील," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यात सरकारी हस्तक्षेपामुळे अडसर येऊ नये, असेही म्हणाले. (Latest Marathi News)

Narendra Modi Speech
Ncp News : अमोल कोल्हेंचा पक्ष प्रवेश लवकरच!; अजितदादांच्या नेत्याचे मोठे विधान

नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "मागील काही वर्षांत जनतेकडून हजारो तक्रारी येत होत्या. आपण जनता जनार्दनला अशा गोष्टीत अडकून ठेवलो की, सरकारची अशी काही विकृत व्यवस्था विकसित झाली. यामधून जनतेची सुटका देण्यात खूप मोठं काम आमच्याकडून झालं आहे. यासाठी मी सभागृहाचा आभारी आहे. अशा तकारीच्या ओझ्याखाली सामान्य माणूस भरडला जातो. मी एकदा लाल किल्ल्यावरुम म्हणाले होतो की, मला मनापासून वाटतं, लोकांच्या आयुष्यातून जितक्या लवकर सरकाचा हस्तक्षेप निघून जाईल, तेवढीच लोकशाहीची ताकद वाढेल. लोकांच्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर सरकारने हस्तक्षेप का करावं? जे अभावात आहेत, त्यांच्यासाठी सरकार नेहमीच हजर राहिले पाहिजे. पण सरकारी हस्तक्षेर त्याच्याआयुष्यात अडसर होईल, अशी लोकशाही असू शकत नाही, असे मोदी म्हणाले.

विरोधकांना काढला चिमटा -

मोदी भाषणात म्हणाले, "निवडणुका आता खूप दूर नाहीत. काही लोकांना निवडणुकीची थोडी भीती वाटत असेल, परंतु ही लोकशाहीची आवश्यक बाजू आहे. आम्ही सर्वजण याला सहजपणे स्वीकार करतो. आम्हाला विश्वास आहे की, आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुका देशाची शान वाढवणारे असतील. आपल्या लोकशाहीची जी परंपरा आहे, ती पूर्ण विश्वाला नवल वाटावे असेच आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संसद सदस्यांचे आभार -

पंतप्रधान मोदी म्हणाले, "17 व्या लोकसभेने 5 वर्षांच्या देशसेवेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि अनेक आव्हानांचा सामना करूनही प्रत्येक घटकाने आपल्या क्षमतेनुसार देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात खासदारांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करताना मोदी म्हणाले, “संकटाच्या काळात देशाच्या गरजा लक्षात घेऊन जेव्हा मी खासदार निधीचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्याबद्दल मी माननीय सर्व खासदारांचे कृतज्ञता व्यक्त करतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com