Janta Dal News : जनता दलाने ठोकला शड्डू ; सर्वच निवडणुका ताकदीने लढविणार...

Loksabha Election : पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिल्या.
Nathabhau Shewale
Nathabhau ShewaleSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता जनता दलानेही (धर्मनिरपेक्ष) मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जनता दल ताकदीने लढविणार आहे. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिल्या.

सांगली येथील सिंधी पुरुषार्थी भवनामध्ये जिल्हा जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अ‍ॅड. सुहास बने, सुमित पाटील, सन्मती गौडाजे, वितराग देवर्षी, प्रणव पाटील, अ‍ॅड. फैय्याज झारी, अ‍ॅड. वैशाली देवर्षी उपस्थित होत्या. यावेळी ते म्हणाले, सध्याच्या राजकारणामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय वातावरण प्रदुषित झाले आहे.

Nathabhau Shewale
Abhishek Ghosalkar : 'या' कारणांमुळे अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू; डॉक्टरांनी दिला पोस्टमार्टेम रिपोर्ट

अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना दिशा देणाऱ्या मार्गदर्शकांची कमतरता भासत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत बेबनाव आहे. राजकीय अस्थिरतेत जनता दल प्रभावी ठरेल. त्यामुळे लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जावू. त्यासाठी राज्यभर दौरे करुन बांधणी करणार आहे. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीही निरुत्साह झटकून कामाला लागावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकेकाळी सांगली जिल्ह्यावर जनता दलाचा प्रभाव होता. सांगली, मिरजेतून जनता दलाचे आमदार निवडून यायचे. काँग्रेस सत्तेच्या कालावधीत या दोन्ही आमदारांनी सभागृह दणाणून सोडले होते. संभाजी पवार, शरद पाटील आणि व्यंकाप्पा पत्की यांनी मांडलेल्या प्रश्नांची राज्य सरकारला दखल घ्यावी लागत होती. परंतु गेल्या काही वर्षात पक्षाच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले.

आता ज्येष्ठ नेतेही नसल्याने त्यांची उणीव सांगली जिल्ह्याला भरुन काढावी लागेल. जिल्ह्यात पुन्हा जनता दलाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु. स्वर्गीय माजी आमदार शरद पाटलांनी राज्याची धुरा माझ्यावर सोपविली. जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या या कार्याचा वारसा यापुढेही सक्षमपणे चालवू. कार्यकर्त्यांच्या बळावर यापुढेही राज्यामध्ये जनता दल पुन्हा भरारी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष शेवाळे यांनी व्यक्त केला.

(Edited by Amol Sutar)

Nathabhau Shewale
MP Omraje Nimbalkar News : 'ईडीची श्वेतपत्रिका काढा, नमुना म्हणून तरी भाजपच्या नेत्यावरची कारवाई दाखवा'; ओमराजे संसदेत गरजले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com