Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ!

PM Modi Oath Taking Ceremony : राष्ट्रपती भवनातील भव्य शपथविधी सोहळ्याने झाली 'Modi Sarkar 3.0'ला सुरुवात; महाराष्ट्रातून सहा जणांनी घेतली आहे मंत्रीपदाची शपथ
Narendra Modi Oath Ceremony
Narendra Modi Oath CeremonySarkarnama

PM Modi Oath Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य समारंभात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. याचबरोबर मोदी सरकारमधील प्रमख मंत्र्यांनीह मंत्रीपदाची शपथ दिली गेली. मोदी सरकारच्या या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रातून सहा मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याचा बहुमान मिळाला आहे.

महाराष्ट्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह रामदास आठवले, प्रतापराव जाधव मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पीयूष गोयल या सहा जणांचा शपथविधी झाला.

Narendra Modi Oath Ceremony
PM Narendra Modi oath ceremony LIVE : नरेंद्र मोदी पंतप्रधान भवनात दाखल...

राष्ट्रपती भवनातील प्रांगणात आयोजित या भव्य अशा शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय, उद्योग, मनोरंजन, क्रीडा यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज व संत-महंताची हजेरी होती. याशिवाय, एनडीए घटक पक्षाचे नेते आणि मोठ्यासंख्येने निमंत्रितांचीही उपस्थिती होती. याचबरोबर विरोधी पक्ष काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही उपस्थिती होती.

Narendra Modi Oath Ceremony
Narendra Modi Oath Ceremony Live Update : मोदींच्या टीममध्ये ‘हे’ असतील मंत्री; वाचा पक्षनिहाय संपूर्ण यादी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' सरकार स्थापन झाले आहे. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 240 जागा जिंकल्या तर एनडीए आघाडीने 294 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला. शपथविधीसाठी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मल्लिकार्जुन खर्गेंही शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासह शेजारील देशांतील पंतप्रधान आणि मंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com