Narendra Modi Ukraine Visit: PM मोदींचा मोठा निर्णय; रशियाचा दौरा केल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच 'युद्धभूमी' युक्रेनला जाणार

Russia Vs Ukraine News : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा रशिया-युक्रेन युद्धानंतर हा पहिलाच युक्रेन दौरा आहे. तब्बल 30 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान युक्रेनचा दौरा करणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News: रशिया -युक्रेन यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये युध्दाचा भडका उडाला होता. यानंतर भारतानं दोन्ही देशांनी युद्धाचा मार्गाऐवजी सांमजस्यानं अन् चर्चेनं विषय सोडवावा अशी भूमिका वेळोवेळी मांडली होती. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचा दौरा केला होता.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण याचवेळी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. युक्रेनचे पंतप्रधान झेलन्सकी यांनी मोदींना युक्रेन भेटीचं निमंत्रण दिलं होतं. ते निमंत्रण मोदींनी स्विकारलं आहे. मात्र, भारताने रशिया आणि युक्रेन दरम्यान मध्यस्थीची भूमिका बजावण्यास या अगोदरच नकार दिला आहे. आपण दोन्ही देशांदरम्यान संदेश पाठविण्यास मदत करू शकतो,असेही स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा रशिया-युक्रेन युद्धानंतर हा पहिलाच युक्रेन दौरा आहे. तब्बल 30 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान युक्रेनचा दौरा करणार आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलन्सकी यांनी नरेंद्र मोदींना युक्रेन भेटीचं निमंत्रण दिलं असून मोदींनीही ते स्वीकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा, 1991 मध्ये युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा असेल. युक्रेनच्या दौऱ्याआधी 21 ते 22 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदी पोलंडला भेट देणार आहेत.

PM Narendra Modi
Ravindra Chavan Vs Ramdas Kadam: नाम तो सुना होगा...! मंत्री रवींद्र चव्हाण 'बेताल' रामदासभाईंना पुरुन उरले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार असल्यानं रशिया काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.महत्त्वाची बाब म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर अवघ्या एकाच महिन्यात पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.

रशिया युक्रेन युध्दामागचं कारण काय..?

युक्रेनला नाटोचं सदस्यपद देण्याविरोधात रशियानं आक्रमक भूमिका घेतली होती. हे सदस्यपद युक्रेनला दिले गेले तर नाटोच्या सदस्य देशांचं सैन्य या दोन्ही देशांच्या सीमेपर्यंत पोहोचू शकते असा आक्रमक पवित्रा घेत रशियाने युक्रेनच्या नाटोच्या सदस्यपदाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

PM Narendra Modi
Shivaji Kalge : काँग्रेस खासदाराची अडचण वाढणार ? हायकोर्टाने दिली नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com