Ravindra Chavan Vs Ramdas Kadam: नाम तो सुना होगा...! मंत्री रवींद्र चव्हाण 'बेताल' रामदासभाईंना पुरुन उरले!

BJP Vs Shivsena : नेहमीच भान हरपल्यासारखे बोलणाऱ्या रामदास कदमांमुळे महायुतीतील शीतयुद्ध निर्णायक वळणावर आल्याचे दिसत आहे. कदमांनी राजीनामा मागितल्यामुळे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे तोंड फोडण्याची भाषा केली आहे. आपला संयम म्हणजे दुबळेपणा ठरतो की काय, अशी भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे आणि त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत.
Ravindra Chavan, Ramdas Kadam
Ravindra Chavan, Ramdas Kadam Sarkarnama
Published on
Updated on

Ravindra Chavan Vs Ramdas Kadam Political News : चार भांडी एकत्र आली की ती वाजतातच, आवाज होतोच, असे नेहमी बोलले जाते. महायुतीत आजकाल असेच चित्र दिसत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महायुतीत एकत्र आलेले आहेत. या पक्षांत सध्या वादविवाद, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, मात्र त्यांची व्याप्ती मोठी आहे. लढाई वर्चस्वाची आहे. त्यामुळे तिला शीतयुद्धाचे स्वरूप आले आहे.

महायुतीतील शिवसेना - भाजप शीतयुद्धाने सोमवारी वेगळे वळण घेतले.माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा कुचकामी, चमकोगिरी करणारे मंत्री असा उल्लेख केला होता.यानंतर चव्हाण यांनी देखील करारी जवाब देत कदमांना हिसका दाखवला. त्यांनी थेट तोंड फोडण्याची भाषा वापरली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुचकामी,चमकोगिरी करणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.

एरवी राजकारण, समाजकारण आणि सत्तेत राहूनही अत्यंत शांत, संयमी राजकारण करणारे रवींद्र चव्हाण नेहमीच चर्चेत असतात.मात्र, रामदासभाईंसारख्या नेत्यांना त्यांच्याच भाषेत हिसका दाखवला.त्यामुळे चव्हाण राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत.रामदासभाईंना पहिल्यांदाच शिवसेनेच्या स्टाईनलेच जबरदस्त करारी जवाब देत चव्हाणांनी रामदासभाईंची जागा दाखवली.

बोलताना मर्यादा न पाळण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून राज्यात रूढ होऊ पाहत आहे. अशा नेत्यांमध्ये रामदास कदम यांचाही समावेश आहे. कदम हे ज्येष्ठ आहेत, कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. असे असतानाही ते विरोधकांसह एकेकाळी सोबत राहिलेल्यांवर आणि सध्या सोबत असलेल्यांवरही बेछूट टीका करत असतात. त्यांना प्रत्युत्तरही तसेच मिळते.

रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजिनक बांधकाम मंत्री आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. हे माहित नसणे म्हणजे अडाणीपणा आहे, अशा आशयाची टीकाही मंत्री चव्हाण यांनी केली. तत्पूर्वी, ठाणे येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात कदम यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

Ravindra Chavan, Ramdas Kadam
Ravikiran Ingwale News : 'त्री देव नव्हे, थ्री..', म्हणत कोल्हापुरात ठाकरे गटाच्या नेत्याने 'महायुती'च्या बॅनरवर साधला निशाणा!

रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावरील टीकेचे प्रकरण येथेच थांबले नाही. या प्रकाराची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. भाजप मंत्र्यांना सतत वेठीस धरणे कोणत्या युतीधर्मात बसते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कदम यांच्याबाबत आम्हालाही 50 गोष्टी बोलता येऊ शकतात, मात्र मोठ्या नेत्यांनी पथ्ये पाळली पाहिजेत. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहोत, असे फडणवीस म्हणाले आहेत.

भाजप मनावर दगड ठेवून महायुतीत सहभागी झाला आहे, असे वक्तव्य आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्यामुळे प्रकरण आता वाटते तितके सोपे राहिलेले नाही. महायुतीतील शीतयुद्ध निर्णायक वळणावर आले आहे का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महायुतीतील कुरबुरी नव्या नाहीत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे सर्वांना वाटले होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. फडणवीस यांना अनिच्छेनेच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले होते. शिंदे मुख्यमंत्री बनले तरी वर्चस्व फडणवीस यांचेच राहील, असे सुरुवातीला वाटले होते.

Ravindra Chavan, Ramdas Kadam
Dilip Walse Patil : वळसे पाटलांच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा डोळा ; म्हणाले,' त्यांनी नाईलाजास्तव निवडणूक लढवण्याऐवजी...'

काही काळ तसे चित्र राहिलेही, मात्र शिंदे या वर्चस्वातून बाहेर पडले. दरम्यानच्या काळात अजितदादा पवार हेही महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी अजितदादांना महायुतीत घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. पालकमंत्रिपदांच्या वाटपात तसे वाटून गेलेही, कारण अजितदादांच्या वाट्याला महत्वाची पालकमंत्रिपदे आली.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांचे उमेदवारही भाजपकडून ठरवले जात होते. हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्यास शिंदे यांना भाग पाडण्यात आले. याला कंटाळून मुख्यमंत्री शिंदे हे एके दिवशी काही तास नॉट रिचेबल झाले होते.

हे सर्व सुरू होण्यापूर्वी शिंदेंचे शिलेदार विजय शिवतारे यांनी अजितदादांची कोंडी करायला सुरुवात केली होती, कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी शिवतारे यांचा आव्हान देऊन पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवतारे सज्ज झाले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, यावर ते ठाम राहिले. अजित पवार यांची पुरती दमछाक करूनच त्यांनी आपल्या भूमिकेवरून माघार घेतली होती.

महायुतीतील तिन्ही पक्षांत अशा पद्धतीने एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याचा पुढचा अंक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महायुतीतले पक्ष सैरभैर झाले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी लाडकी बहीण ही योजना आणण्यात आली आहे. पुन्हा निवडून आलो तर या योजनेची रक्कम दुप्पट करणार, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे.

या योजनेवरूनही कुरघोड्या करण्याची संधी महायुतीतील नेते सोडत नसल्याचे दिसत आहे. सरकार बदलले की योजना बदलते. ही योजना सुरू राहण्यासाठी पुन्हा आमचे सरकार आले पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे विधान कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे.

Ravindra Chavan, Ramdas Kadam
Shivaji Kalge : काँग्रेस खासदाराची अडचण वाढणार ? हायकोर्टाने दिली नोटीस

देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता. आम्ही छातीवर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारला आहे, असे वक्तव्य त्या मेळाव्यात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर गदारोळ उडाला होता. फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याची सल भाजप नेत्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर भाजपचे सरकार आले तर फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे.

भाजप मनावर दगड ठेवून महायुतीत सहभागी झाला आहे, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केले आहे.रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा मागितल्यानंतर या घडामोडी सुरू झाल्या आहेत.आपला संयम हा दुबळेपणा ठरतोय की काय, अशी भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे.तसे होऊ नये, यासाठी भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

Ravindra Chavan, Ramdas Kadam
Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकींचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला; हायकमांड दखल घेणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com