प्रगायराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज (वय ७२) प्रयागराज येथील निवासस्थानी (ता. २१) मृतावस्थेत आढळले होते. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा उल्लेख त्यात आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आला आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवावा, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारने केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही मागणी केली होती. गेले चार दिवस देशभरात या प्रकरणावरून उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.
महंत नरेंद्रगिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेकांची नावे असल्याची चर्चा आहे. नरेंद्रगिरी ७२ वर्षांचे होते. एप्रिलच्या प्रारंभी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनी आश्रमात स्वतःचे विलगीकरण केले होते. गेल्या सोमवारी बाघम्बरी मठात नरेंद्रगिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी दुसऱ्या दिवशी १८ सदस्यांचे विशेष तपास पथक तयार केले होते. मात्र विरोधी पक्षांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.