Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू आता सुरू करणार नवी इनिंग; पत्रकारपरिषद घेत स्वत:च केली घोषणा!

Navjot Singh Sidhu announcement : जाणून घ्या, आता सिद्धूने नेमका काय निर्णय घेतला आहे आणि काय दिली आहे नेमकी माहिती?
Navjot Singh Sidhu announces the launch of his official YouTube channel ‘Navjot Sidhu Official’ to connect with the public and share his views directly.
Navjot Singh Sidhu announces the launch of his official YouTube channel ‘Navjot Sidhu Official’ to connect with the public and share his views directly. sarkarnama
Published on
Updated on

Navjot Sidhu Launches Official YouTube Channel :आधी क्रिकेट नंतर राजकारण मग मनोरंजन क्षेत्रात काम कामगिरी बजावल्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकारपरिषद घेत घोषणा केली आहे. कालापासून सिद्धू काय निर्णय घेणार, काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष होते आणि तशी उत्सुकता लागून होती.

अखेर ही उत्सुकता संपली असून, सिद्धू यांनी आता यूट्यूबच्या जगात पदार्पण केले आहे. होय सिद्धू यांनी आता 'Navjot Sidhu Official' या नावाने यूट्यूबच्या विश्वात प्रवेश केला आहे. पत्रकारपरिषदेत याबाबत घोषणा करत असताना नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबरोबर त्यांची मुलगी देखील होती.

Navjot Singh Sidhu announces the launch of his official YouTube channel ‘Navjot Sidhu Official’ to connect with the public and share his views directly.
Modi Government : पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; 'RAW'च्या माजी अध्यक्षांना विशेष जबाबदारी!

यावेळी अधिक माहिती देताना सिद्धू यांनी सांगितले की, 'Navjot Sidhu Official'द्वारे ते त्यांच्या जीवनातील अनुभव, क्रिकेट, कॉमेंट्री, प्रेरणादायी भाषणं, जीवनशैली याबाबत बोलतील. मात्र यावर राजकारणाबाबत काहीही बोलले जाणार नाही.

Navjot Singh Sidhu announces the launch of his official YouTube channel ‘Navjot Sidhu Official’ to connect with the public and share his views directly.
Khawaja Asif : 'अब आया ऊँट पहाड़ के नीचे' ; अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यास भारताने आणलं वठणीवर!

जेव्हा सिद्धू यांना विचारलं गेलं की तुम्ही सक्रीय राजकारणात कधी पुनरागमन करणार? तेव्हा त्यांनी सांगितले की येणारा काळच याबाबत उत्तर देईल. विशेष म्हणजे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले नवज्योत सिद्धू हे मागील काही महिन्यांपासून पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नसल्याचे दिसत आहे. एवढंच नाहीतर त्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही प्रचार केला नव्हता.

Navjot Singh Sidhu announces the launch of his official YouTube channel ‘Navjot Sidhu Official’ to connect with the public and share his views directly.
PM Modi High-Level Meeting : काहीतरी मोठं घडणार! पंतप्रधान मोदींनी बोलावली हायलेव्हल मीटिंग; राजनाथ सिंह, अजित डोवालसह तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख हजर

मीडियाशी बोलताना सिद्धू म्हणाले की, ते आपल्या जीवनातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहेत. त्यांनी सांगितले की मी आपले विचार समोर मांडेन. यामध्ये माझ्या जीवनाबद्दल सर्वकाही असेल, परंतु राजकाराणाबाबत नाही.

Navjot Singh Sidhu announces the launch of his official YouTube channel ‘Navjot Sidhu Official’ to connect with the public and share his views directly.
India Attack Possibility : ‘’भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्य अलर्टवर; खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाच धडकी!

तसेच त्यांनी सांगितले की, अनेक राजकारणी असे आहे, ज्यांनी राजकारणास एक व्यवसाय म्हणून घेतले आहे. मी लोकांच्या कल्याणासाठी राजकारण केलं, हा माझ्यासाठी कधीच व्यवसाय नव्हता. चारित्र्याशी कधीच तडजोड केली नाही. तुम्ही माझ्या मुलांनाही विचारू शकता, की राजकारणाचा एकही पैसा मी घेतला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com