फडणविसांची काडी योग्य ठिकाणी पडली... तीन मंत्र्यांची होरपळ...

Nawab Malik | ED Arrested | NCP : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली तातडीची बैठक
Nawab Malik, Anil Deshmukh Sanjay Rathod
Nawab Malik, Anil Deshmukh Sanjay Rathod Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आज सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ७ वाजता मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी जाताना मलिक हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

अटक झाल्यानंतर मलिक यांनी नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांना आता मेडिकलसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे जमीनीबाबतचे थेट आणि कमी पैशात व्यवहार झाले होते. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

Nawab Malik, Anil Deshmukh Sanjay Rathod
मोठी बातमी : तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर नबाव मलिक यांना अटक

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांशी संबंधित अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

Nawab Malik, Anil Deshmukh Sanjay Rathod
"फक्त २०२४ पर्यंत थांबा; त्यानंतर..." संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान या कारवाईनंतर नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. अटक झाल्यानंतर पारदर्शक चौकशीसाठी मंत्रीपदी राहू नये असे संकेत असतात. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक होत आहे. याच बैठकीनंतर मलिक राजीनामा देण्याची शक्यता आहे. मलिक यांनी राजीनामा दिल्यास हा महाविकास आघाडीमधील हा तिसरा राजीनामा ठरणार आहे. यापूर्वी वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com