Misir Besra Arrested : 2 कोटी 20 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी म्होरक्या जाळ्यात; मिसिर बेसराला अटक!

Security Operation Naxalite : मिसिर बेसरा नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेत्यापैकी एक आहे. पाॅलिटब्युरोचे सदस्य असलेल्या आणि सक्रीय असलेल्या शेवटच्या दोन नेत्यांमध्ये त्याचा समावेश होता.
Misir Besra Arrested
Misir Besra Arrestedsarkarnama
Published on
Updated on

Misir Besra News : तब्बल दोन कोटींचे बक्षीस ज्या कुख्यात माओदी नेत्यावर जाहीर करण्यात आले होते. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मिसिर बेसरा असे अटक केलेल्या माओदी नेत्याचे नाव आहे. तो मागील 40 वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रीय होता.

त्याला झारखंड धनबाद व गिरिडीहच्या सीमेवरील मनियाडीह परिरसरात सुरक्षादलाने त्याच्या दोन साथीदारांसह बेड्या ठोकल्या.

मिसिर बेसरा नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेत्यापैकी एक आहे. पाॅलिटब्युरोचे सदस्य असलेल्या आणि सक्रीय असलेल्या शेवटच्या दोन नेत्यांमध्ये त्याचा समावेश होता. त्याच्यावर सरकारने तब्बल दोन कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दुसऱ्यांदा अटक

बेसरा याला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, बिहारमधील लखीसराय न्यायालयावर सशस्त्र हल्ला करत नक्षलवाद्यांनी त्याला सोडवून नेण्यात आले होते. तो मुळचा झारखंडमधील पिरतांड गावचा रहिवासी आहे.

Misir Besra Arrested
Abhijeet Dipke : धर्मेंद्र प्रधाना यांच्यानंतर अभिजीत दीपकेंनी अमित शहांकडे मोर्चा वळवला; थेट राजीनाम्याची मागणी करत म्हणाले, "तुम्ही फेल..."

40 वर्ष परिवाराच्या संपर्कात नाही

मिसिर बेसराचा भाऊ देवीलाल बेसरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तो गेली 40 वर्ष कुटुंबाच्या संपर्कात नाही. त्याना माहिती मिळाली आहे की, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 40 वर्ष होत आले तो घरी आला नाही. घरच्यांनी अनेकदा आवाहन करत त्याला पोलिसांसमोर शरणागती पत्कारण्यास सांगितले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात त्याची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला असे देखील देवीलाल यांनी सांगितले.

Misir Besra Arrested
Parliament debate : राहुल गांधींनी स्वत:लाच सापळ्यात अडकविले..! थेट अमित शहांना भिडल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा पारा चढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com