Gunratna Sadavarte: मोठी बातमी ! मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ, तर काही ठिकाणी आमदारांची घरं पेटवल्याची घटना घडली.

मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र होत असतानाच आता मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gunratna Sadavarte
Maratha Reservation: 'मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे...; प्रकाश सोळंकेंचा गौप्यस्फोट

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटलांच्या सभेवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यानंतर आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्याची घटना घडली. आता सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे सदावर्ते आणि आंदोलक यांच्यातील वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 8 नोव्हेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावर आता हायकोर्ट काय टिप्पणी करतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Gunratna Sadavarte
Mla Disqualification Case : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये व्हिपवरून खडाजंगी; नार्वेकरांचं सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com