Santosh Deshmukh last words : अपहरणानंतर संतोष देशमुखांचा शेवटचा शब्द काय होता? चालकाने सर्व घटनाक्रमच सांगितला

Santosh Deshmukh Kidnapping case latest update : संतोष देशमुख यांचे अपहरण नेमके कसे झाले? याबाबत प्रत्यक्षदर्शीनी जबाब नोंदवला आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातून धक्कादायक घटनाक्रम समोर येत आहे. त्यासोबतच या प्रकरणातील विविध व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामधून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांचे अपहरण नेमके कसे झाले? याबाबत प्रत्यक्षदर्शीनी जबाब नोंदवला आहे. तर संतोष देशमुख अपहरणानंतर त्यांच्यासोबत असलेल्या चालकाला शेवटी नेमके काय म्हणाले? हे जबाबातून आता पुढे आले आहे.

डोणगांव टोलनाक्यावर देशमुख यांचे अपहरण होण्याआधी नेमके काय घडलं? याचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शीने जबाबात उलघडून सांगितला. ९ डिसेंबरला संतोष देशमुख आपल्या चारचाकीवरून केजकडून मस्साजोगला जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एक चालकही होता. अचानक एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यावर कोयता ठेवला आणि देशमुखांचे अपहरण केले, असे प्रत्यक्षदर्शीने जबाबात स्पष्ट केले.

Santosh Deshmukh Murder Case
Mahayuti Government : सरकार, ‘माफी’ असावी! तुमचं काम झालं... 'पुढच्या तयारी'चं काय?

संतोष देशमुखांचं जेव्हा अपहरण करण्यात आले. त्याचवेळी त्यांना हत्या होणार असल्याचे लक्षात आले होते. अपहरण करण्यासाठी आलेले लोक आपल्याला जीवे मारणार असल्याचं संतोष देशमुख यांच्या लक्षात आले होते, असे त्यांच्या चालकाने जबाबात सांगितले आहे.

अपहरणावेळी नेमके काय घडले ?

डोणगांव टोलनाक्यावर काळया रंगाची स्कार्पिओने संतोष देशमुख यांची गाडी अडवली. मागून-पुढून दोन गाड्यांनी देशमुखांच्या गाडीची वाट अडवून धरली. दोन्ही गाड्यांमधून सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे उतरले. सुधीर सांगळे याने एक मोठा दगड घेवून देशमुखांच्या गाडीच्या काचेवर मारला. त्यावेळी या आरोपींच्या हातामध्ये प्लास्टिकचा पाईप, गॅसचा पाईप, क्लच वायर गुंडाळलेला लाकडी दांडा, लाकडी काठी व इतर शस्त्रे होते.

Santosh Deshmukh Murder Case
Mahayuti political conflict : महायुतीमधील सुप्त संघर्ष तीव्र होणार? विधिमंडळ समित्यावरून मंत्रिपद हुकलेल्या आमदारांचे पुनर्वसन, नाराजांचे काय?

त्यानंतर या सर्व आरोपींनी मिळून संतोष देशमुख यांना गाडीतून खाली ओढले आणि मारहाण केली. मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकले. यावेळी संतोष देशमुख चालकाला म्हणाले, 'बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जिवे मारणार आहेत.' त्यानंतर लगेचच संतोष देशमुख यांना गाडीत घेऊन आरोपी केजच्या दिशेने गेले. त्याचवेळी स्वीफ्ट गाडीदेखील काळ्या स्कार्पिओच्या मागे गेली, असेही चालकाने यावेळी जबाबात सांगितले.

Santosh Deshmukh Murder Case
BJP Politics : भाजपने हकालपट्टी करताच आमदार पाटलांची मोठी घोषणा; हिंदू पक्षाचे दिले संकेत...

ही घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आणि धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना या घटनेची माहितीही दिली. मात्र, पोलिसांनी (Police) या दोघांना तब्बल साडेतीन तास पोलीस ठाणे बाहेर बसवून ठेवले होते. पोलिसांनी त्यावेळी अनेक कारणेही दिली असल्याचे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : तुळजापुरात पाऊल ठेवताच सीएम फडणवीसांनी केली मोठी घोषणा; म्हणाले,'येत्या दोन वर्षातच...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com